27.4 C
Mālvan
Saturday, July 27, 2024
IMG-20240531-WA0007

आम्ही ‘त्या’ योजनेच्या अंमलबजावणीसाठी सदस्य म्हणून सक्षम असल्याने खास. विनायक यांनी त्यात लक्ष घालू नये : विष्णू मोंडकर.

- Advertisement -
- Advertisement -

केंद्र सरकारची स्वदेश दर्शन योजना 2.0. अंमलबजावणीचा मुद्दा

सिंधुदुर्ग : खासदार श्री विनायक राऊत हे त्यांच्या जिल्ह्यातील प्रत्येक राजकीय भाषणात मला निवडून द्या, मी स्वदेश दर्शन 2.0 योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून आणून जिल्ह्यात पर्यटनातून रोजगार निर्मिती करेन असे सांगत फिरत आहेत. वास्तविक त्यांनी अशा प्रकारे बोलत असताना योजनेची माहिती घेऊन बोलणे गरजेचे आहे असा सल्ला स्वदेश या योजनेची केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणे राज्य सरकारने स्वदेश दर्शन 2.0 साठी कमिटी गठीत केली आहे आणि कमिटीचे जिह्यात नियोजन बद्ध काम सुरु आहे त्यामुळे या योजना स्थानिक प्रशासन स्थानिक नागरिक यांना सोबत घेऊन स्वदेश दर्शन योजना राबविण्यासाठी आम्ही सदस्य म्हणून आम्ही सक्षम असल्याचे स्वदेश दर्शन 2.0 योजनेचे सदस्य विष्णू मोंडकर यांनी यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे व्यक्त केले आहे. मोंडकर यांनी, या विषयात खासदार महोदयांनी लुडबुड किंवा हस्तक्षेप करू नये असे सांगताना ह्या योजनेची केंद्र सरकार मार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्यक्ष अंबलबजावणी साठी सुरवात झाली असून या माध्यमातून स्थानिक नागरिकांना अपेक्षित कामही सुरु झाल्याची माहिती दिली आहे

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘नेव्ही डे’ यशस्वी रित्या सदर कार्यक्रम पार पडला त्याच वेळी राजकोट किल्ल्याचे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या हस्ते करण्यात आले सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळालेला हा सन्मान अभिमानास्पद आहे. त्याच बरोबर सिंधुदुर्ग जिल्हाचे जागतिक पातळीवर पर्यटन पोचवून त्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना स्वयंरोजगार उपलब्ध होऊन जिल्ह्यात शाश्वत पर्यटन व्यवसाय उभा होण्यासाठी महाराष्ट्र राज्यात एकमेव सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड केंद्र सरकार कडून स्वदेश दर्शन 2.0 साठी करण्यात आली असून पंतप्रधान यांनी या माध्यमातून जिल्ह्याला राष्ट्रीय ,आंतराष्ट्रीय पर्यटन केंद्र बनण्याच्या दृष्टीने उचलले पाऊल जिल्ह्यातील जनतेला आत्मनिर्भर बनण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे असे विष्णू मोंडकर यांनी विशेष नमूद केले आहे.

केंद्र सरकारने भारतातील पर्यटन क्षेत्रात वाढ होण्यासाठी देशातील ५८ जिल्ह्यांची निवड केली असून महाराष्ट्र राज्यातील एकमेव सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड करण्यात आली असून सदर योजना स्वदेश 2.0 या नावाने कार्यान्वित करण्यात आली असून जिल्ह्यातील शाश्वत पर्यटनासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या च्या माध्यमातून नियोजन बद्ध सुरवात झाली असून या नुसार जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रातील हॉटेल, होम स्टे, ऍग्रो टुरिझम,रीसॉर्ट क्षेत्रातील पर्यटन व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी स्थानिक सोयी सुविधा ,निधी पोर्टल रजिस्टर माहितीसाठी व्यावसायिकांची कार्यशाळा न्याहरी निवास सर्वेक्षण तसेच कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण कार्यक्रम जिल्ह्यातील तालुका स्तरावरील गावा गावात राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यावेळी श्री विष्णू मोंडकर स्वदेश दर्शन समिती सदस्य तसेच अध्यक्ष पर्यटन व्यवसायिक महासंघ यांनी पुढे सांगितले आहे की जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय स्थानिकांनी कुठल्याही शासकीय मदतीशिवाय स्वकर्तृत्वावर उभा केला असून ह्या भागात आज जिल्ह्यात पर्यटन व्यवसाय बहरत आहे जिल्ह्यातील शाश्वत पर्यटन विकासासाठी स्वदेश दर्शन योजनेच्या माध्यमातून सागरी पर्यटना बरोबर जिल्ह्यातील बारमाही पर्यटन वाढीसाठी काम चालू असल्याचे सांगितले .

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

केंद्र सरकारची स्वदेश दर्शन योजना 2.0. अंमलबजावणीचा मुद्दा

सिंधुदुर्ग : खासदार श्री विनायक राऊत हे त्यांच्या जिल्ह्यातील प्रत्येक राजकीय भाषणात मला निवडून द्या, मी स्वदेश दर्शन 2.0 योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून आणून जिल्ह्यात पर्यटनातून रोजगार निर्मिती करेन असे सांगत फिरत आहेत. वास्तविक त्यांनी अशा प्रकारे बोलत असताना योजनेची माहिती घेऊन बोलणे गरजेचे आहे असा सल्ला स्वदेश या योजनेची केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणे राज्य सरकारने स्वदेश दर्शन 2.0 साठी कमिटी गठीत केली आहे आणि कमिटीचे जिह्यात नियोजन बद्ध काम सुरु आहे त्यामुळे या योजना स्थानिक प्रशासन स्थानिक नागरिक यांना सोबत घेऊन स्वदेश दर्शन योजना राबविण्यासाठी आम्ही सदस्य म्हणून आम्ही सक्षम असल्याचे स्वदेश दर्शन 2.0 योजनेचे सदस्य विष्णू मोंडकर यांनी यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे व्यक्त केले आहे. मोंडकर यांनी, या विषयात खासदार महोदयांनी लुडबुड किंवा हस्तक्षेप करू नये असे सांगताना ह्या योजनेची केंद्र सरकार मार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्यक्ष अंबलबजावणी साठी सुरवात झाली असून या माध्यमातून स्थानिक नागरिकांना अपेक्षित कामही सुरु झाल्याची माहिती दिली आहे

सिंधुदुर्ग जिल्ह्यात 'नेव्ही डे' यशस्वी रित्या सदर कार्यक्रम पार पडला त्याच वेळी राजकोट किल्ल्याचे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या हस्ते करण्यात आले सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळालेला हा सन्मान अभिमानास्पद आहे. त्याच बरोबर सिंधुदुर्ग जिल्हाचे जागतिक पातळीवर पर्यटन पोचवून त्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना स्वयंरोजगार उपलब्ध होऊन जिल्ह्यात शाश्वत पर्यटन व्यवसाय उभा होण्यासाठी महाराष्ट्र राज्यात एकमेव सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड केंद्र सरकार कडून स्वदेश दर्शन 2.0 साठी करण्यात आली असून पंतप्रधान यांनी या माध्यमातून जिल्ह्याला राष्ट्रीय ,आंतराष्ट्रीय पर्यटन केंद्र बनण्याच्या दृष्टीने उचलले पाऊल जिल्ह्यातील जनतेला आत्मनिर्भर बनण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे असे विष्णू मोंडकर यांनी विशेष नमूद केले आहे.

केंद्र सरकारने भारतातील पर्यटन क्षेत्रात वाढ होण्यासाठी देशातील ५८ जिल्ह्यांची निवड केली असून महाराष्ट्र राज्यातील एकमेव सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड करण्यात आली असून सदर योजना स्वदेश 2.0 या नावाने कार्यान्वित करण्यात आली असून जिल्ह्यातील शाश्वत पर्यटनासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या च्या माध्यमातून नियोजन बद्ध सुरवात झाली असून या नुसार जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रातील हॉटेल, होम स्टे, ऍग्रो टुरिझम,रीसॉर्ट क्षेत्रातील पर्यटन व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी स्थानिक सोयी सुविधा ,निधी पोर्टल रजिस्टर माहितीसाठी व्यावसायिकांची कार्यशाळा न्याहरी निवास सर्वेक्षण तसेच कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण कार्यक्रम जिल्ह्यातील तालुका स्तरावरील गावा गावात राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यावेळी श्री विष्णू मोंडकर स्वदेश दर्शन समिती सदस्य तसेच अध्यक्ष पर्यटन व्यवसायिक महासंघ यांनी पुढे सांगितले आहे की जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय स्थानिकांनी कुठल्याही शासकीय मदतीशिवाय स्वकर्तृत्वावर उभा केला असून ह्या भागात आज जिल्ह्यात पर्यटन व्यवसाय बहरत आहे जिल्ह्यातील शाश्वत पर्यटन विकासासाठी स्वदेश दर्शन योजनेच्या माध्यमातून सागरी पर्यटना बरोबर जिल्ह्यातील बारमाही पर्यटन वाढीसाठी काम चालू असल्याचे सांगितले .

error: Content is protected !!