युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च जिल्हास्तरीय स्पर्धेत कुडाळ तालुक्यात प्रथम आणि जिल्ह्यात तृतीय क्रमांक केला प्राप्त.
कुडाळ | देवेंद्र गावडे : कुडाळ तालुक्यातील नेरूर शिरसोस प्राथमिक शाळेच्या इयत्ता तिसरी मधील विद्यार्थी कु. पियुष विजय लाड याने १९० गुण ( ९५% ) प्राप्त करत कुडाळ तालुक्यामधून प्रथम तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून तृतीय क्रमांक पटकावला. युवा संदेश प्रतिष्ठानच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांसाठी ‘सिंधुरत्न टॅलेंट सर्च’ या जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हाभरातून इयत्ता तिसरी मधून १२०० विद्यार्थी या टॅलेंट सर्च परिक्षेला बसले होते.
युवा संदेश प्रतिष्ठान तर्फे कु. पियुष याला गोल्ड मेडल तसेच रोख रक्कमेचे पारितोषिक व गोवा सायन्स सेंटरला भेट देण्याची संधी प्रदान करून त्याचा गुणगौरव करण्यात येणार आहे. विशेष मार्गदर्शन करणा-या नेरूर शिरसोस प्राथमिक शाळेच्या उपशिक्षिका श्रीम. घाटकर तसेच आपले पालक यांना कु. पियुष या परिक्षेतील यशाचे श्रेय दिले आहे. नेरूर मधून तसेच कुडाळ तालुक्यामधून कु. पियुष विजय लाड याचे अभिनंदन होत आहे.