मालवण | प्रतिनीधी : मालवण येथील भंडारी कनिष्ठ महाविद्यालयातून एकूण ९३ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यातील सहा परीक्षार्थी विशेष प्राविण्याने उत्तीर्ण झाले तर प्रथम श्रेणी मध्ये ३७ परीक्षार्थी आणि द्वितीय श्रेणीत ४७ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर तीन परीक्षार्थीनी उत्तीर्ण श्रेणी मिळविलेली आहे.
या कनिष्ठ महाविद्यालयाचा शाखा निहाय्य निकाल खालिलप्रमाणे आहे.
कला शाखा प्रथम – लक्ष्मी मेघश्याम जाधव ( ४०१ गुण / ६६.८३% ), द्वितीय – वैभवी आत्माराम खानोलकर ( ३८८ गुण / ६४.६७% ), तृतीय – रिद्धी रवींद्र बिलये ( ३८७ गुण / ६४.५०% ),
वाणिज्य शाखा प्रथम – नितल बाळकृष्ण भांडे ( ५७६ गुण / ९६% ), द्वितीय – धनश्री संतोष कानंळगावकर ( ४८३ गुण / ८०.५०% ), तृतीय – सुहाना शकील मालपेकर ( ४८२ गुण / ८०.३३% ),
विज्ञान शाखा प्रथम – अनुष्का संजय जाधव ( ४५० गुण / ७५% ) द्वितीय – दिपलक्ष्मी सुनिल मलये ( ४४० गुण / ७३.३३% ) तृतीय – चिन्मय सुखानंद गवंडी ( ४३६ गुण / ७२.६७% ).
या सर्व विद्यार्थ्यांचे प्राचार्य व्ही. जी. खोत, संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर, ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, चेअरमन सुधीर हेरेकर यांनी तसेच इतर संस्था चालक , शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.