मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणचे सामाजिक कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर यांच्यावतीने मालवण शहरातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाचा एक विशेष खेळ ( शो ) आयोजीत करण्यात आला आहे. शुक्रवार दिनांक ५ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता ‘समर्थ चित्रपटगृह, देवबाग’ येथे हा मोफत शो दाखविण्यात येणार आहे. स्वातंत्रवीर सावरकर कोण होते, त्यांचे भारताच्या स्वातंत्र्यात कसे योगदान होते, त्यांनी हिंदू राष्ट्रासाठी कसे बलिदान दिले, त्यांनी कशी शिक्षा भोगली या सर्व गोष्टींवर आधारित हा चित्रपट असून शहरातील विद्यार्थी तसेच युवावर्गाला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ यांच्या जीवन चरीत्राची माहिती व्हावी, असा या विशेष मोफत शो चा उद्देश असल्याचे सौरभ ताम्हणकर यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे सांगितले आहे.
विद्यार्थ्यांसोबत एका पालकाला या शोसाठी मोफत पास देण्यात येणार आहे. शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी – विद्यार्थिनींनी तसेच पालकांनी मोठ्या संख्येने या चित्रपटाच्या मोफत शो चा लाभ द्यावा असे आवाहन सौरभ ताम्हणकर यांच्या वतीने करण्यात आले आहे. या मोफत शो संदर्भात अधिक माहिती साठी सौरभ ताम्हणकर ७५८८५६४८८७ / ९२०९३३३०१२ या क्रमांकांवर संपर्क साधायचे आवाहन करण्यात आले आहे.