मालवण | सुयोग पंडित : विविध राजकीय आरोप आरोप प्रत्यारोपांचे पडसाद विविध सामाजिक वाॅटस् ॲप समूहांवर सध्या दिसत आहेत. विविध समूहांवरील काही सदस्य त्यांची राजकीय बाजू मांडताना होत असलेल्या वैयक्तिक टीका टिपण्णीमुळे विविध सामाजिक वाॅटस् ॲप समूहांवरील वातावरण काहीसे संवेदनशील बनलेले आहे. या दरम्यान विविध सामाजिक वाॅटस् ॲप समूहांच्या ॲडमीनसची गोची होत असल्याचे चित्र सध्या आभासी सामाजिक मंच असलेल्या वाॅटस् ॲप समूहांवर दिसत आहे. दरम्यान विविध सामाजिक वाॅटस् ॲप समूहांवरील काही सदस्य, सुसंकृतपणे आणि सामोपचाराने चर्चा व संवाद घडावा असे आवाहनही करत आहेत.

सामाजिक वाॅटस् ॲप समूहांवर राजकीय आरोप प्रत्यारोपांचे पडसाद ; सामाजिक वाॅटस् ॲप समूह संघटक ॲडमीनसची होत आहे गोची.
69
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -