मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या डॉ दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय, कट्टा यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सात दिवसीय निवासी विशेष श्रमसंस्कार शिबिर गोळवण येथे आयोजित करण्यात आले. या अंतर्गत स्ट्रेस मॅनेजमेंट या विषयावर मालवण पंचायत समितीचे कृषी अधिकारी संजय गोसावी यांनी आजच्या जीवनशैलीत असणाऱ्या ताणतणावाबद्दल आणि त्यातून कसे बाहेर पडता येईल याबाबत सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
जीवन निरोगी राहण्यासाठी योगा करणे आवश्यक आहे. ताणतणाव आपल्या पासून लांब ठेवून निरोगी आयुष्य वाढविता येणे शक्य असल्याचे श्री गोसावी म्हणाले. यावेळी गोळवण सरपंच सुभाष लाड, उपसरपंच शरद मांजरेकर, कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टाचे सहसचिव श्री साबाजी गावडे, कट्टा महाविद्यालयाचे उपप्राचार्य रविंद्र गावडे, एन एस एस विभाग प्रमुख मिलिंद कदम, एन एस एस चे विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.