कुडाळ | देवेंद्र गावडे ( उपसंपादक ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जि.प.प्राथ.शाळा श्री गणेश विद्यालय नेरुर वाघोसेवाडी व शालेय व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने, २३ जानेवारीला नवजीवन वाघोसेवाडी मित्र मंडळ आयोजित खापरी चॕम्पियन चषक स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेचे उदघाटन भारतमातेच्या पूजनाने संपन्न झाले. यावेळी सरपंच सौ. भक्ती घाडीगांवकर, उपसरपंच श्रीदत्ताराम म्हाडदळकर, ग्राम. पं. सदस्य मंजुनाथ फडके, पंच सौरभ माळवदे, अमेय सावंत, जतीन राऊळ, कॅमेरामॅन मिलिंद आडेलकर, श्री.मिलिंद पंत वालावलकर , श्री.एकनाथ सावंत,इतर शाळेचे शिक्षक , पालक ,अंगणवाडी विद्यार्थी, सहा शाळेचे पहिली ते चौथीचे विद्यार्थी उपस्थित होते.
या स्पर्धेची सुरुवात ही अभिनय स्पर्धेने झाली. यानंतर जवळपास वीस प्रकारच्या जुन्या खेळांचे आयोजन केलेले होते.उपस्थित मान्यवरानीही या खेळांचा आस्वाद घेतला. या स्पर्धेत उत्तेजनार्थ अनुक्रमे नेरुर नं.१ शाळा, गोंधयाळे शाळा व कांडरीवाडी शाळा तर तृतीय क्रमांक चांदोस शाळा,द्वितीय क्रमांक शिरसोसवाडी शाळा आणि प्रथम चॕम्पियन चषकावर नाव शाळा श्री गणेश विद्यालय नेरुर वाघोसेवाडी ने कोरले. विजेत्यांना विविध बक्षिसे व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
या स्पर्धेचे बक्षीस वितरण सरपंच सौ. भक्ती घाडीगांवकर, नवजीवन वाघोसेवाडी मित्रमंडळाचे अध्यक्ष श्री प्रकाश हळदणकर, श्री प्रभाकर शृंगारे, सौ.माया शृंगारे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ.संजना परब , सौ.स्वाती शृंगारे, सौ.ममता परब, सौ.सुजाता भगत, सौ.प्रार्थना परब, वाघोसेवाडी शाळेचे मुख्याधापक श्री.जनार्दन पाटील,गोंधयाळे शाळेचे मुख्याध्यापक श्री.प्रसाद कुंटे इतर शाळेचे शिक्षक गोसावी मॅडम, वरुटे सर, मुख्याध्यापक श्रीकृष्ण ठाकूर सर, मुख्याध्यापक श्री.सहदेव पालकर सर आणि इतर पालक वर्ग यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी या स्पर्धेसाठी मदत करणाऱ्या दात्यांचे आभार मानण्यात आले.या स्पर्धेसाठी बक्षिसे ही श्री.प्रभात वालावलकर कुटूंबियांकडून आणि कुमारी. प्रणया रंजन राणे कुटूंबियांकडून देण्यात आली,सर्व चषके ही नवजीवन वाघोसेवाडी मित्रमंडळाचे अध्यक्ष श्री प्रकाश हळदणकर यांनी दिली.या स्पर्धेची प्रमाणपत्र ही अन्नपूर्णा भोजनालय नेरुर ,ग्राम.पं.सदस्य श्री.गोविंद कुडाळकर, ग्राम.पं.सदस्या सौ. रोशनी नाईक सौजन्याने देण्यात आली .यास्पर्धेत मुलांसाठी अल्पोपहार-जेवण श्री .रंजन राणे व श्री. राजा शृंगारे यांनी दिले. जेवणासाठी मदत श्री.रमेश गावडे , श्री.निकेश शृंगारे यांनी केले विशेष मदत ग्रामपंचायत नेरुर देऊळवाडा,श्री. उमाकांत तांबे , श्री. शशिकांत नेरुरकर गुरुजी आणि विनय गावडे (ॐकार मित्रमंडळ वाघचौडी)यांनी केली.
संपुर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन वाघोसेवाडी शाळेचे मुख्याध्यापक श्री.जनार्दन पाटील यांनी केले.