मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांचा जिल्हास्तरीय मेळावा सिद्धिविनायक मंदिर कसाल येथे संपन्न झाला. दिव्यांग विकास आघाडी सिंधुदुर्ग च्या वतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याचा प्रमुख अतिथी म्हणून दिव्यांगांचे महाराष्ट्र संयोजक श्री चौहान उपस्थित होते. दिव्यांग महिला व इतर महिलांनी ओवाळणी करून त्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत उपस्थित होते. जिल्हा संयोजक श्री अनिल शिंगाडे, प्रकाश सावंत, प्रकाश वाघ, शामसुंदर लोट, मनोज सातोसे, आरती बापट, दीक्षा तेली, सुधीर चव्हाण, सत्यवान पावले, विजय कदम आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
त्यानंतर मान्यवरांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले व आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिंगाडे यांनी केले. दिव्यांग विकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. त्यानंतर चौहान यांनी मार्गदर्शन केले. आणि आढावा बैठक संपन्न झाली.
या कार्यक्रमाला सत्तरहून अधिक दिव्यांग बांधव उपस्थित होते. भाजप दिव्यांग आघाडीच्या वतीने उपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. नंतर भागीरथी शिंगाडे, सायली सावंत, प्रणाली दळवी यांनी पुढाकार घेऊन दिव्यांग महिलांचा हळदीकुंकू समारंभ पार पडला. उपस्थितांचे आभार सौ आरती बापट यांनी मानून कार्यक्रम संपन्न झाला.