मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या ग्रामपंचायत बिळवस येथे विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमाला ग्रामस्थांचा प्रतिसाद लाभला. बिळवस गावच्या सरपंच सौ. मानसी लक्ष्मण पालव यांनी श्रीफळ फोडून प्रारंभ केला.
या कार्यक्रमाला पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री. नांदोसकर, वैधकीय अधिकारी डॉ. विणा मेहंदळे, कृषि विभागाच्या सौ. सुषमा धामापूरकर तसेच बिळवस गावातील प्रतीष्ठित व्यक्ती व समाजसेवक उपस्थित होते. पोलीस श्री. नादोस्कर यांनी सर्व ग्रामस्थांना गुन्हेगारी करण्यापासून आपल्या मुलांना कसे रोखावे याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. डॉ. विणा मेहंदळे यांनी सर्वांना आरोग्या विषयी माहिती दिली. शासनाच्या योजनेचा लाभ घेतलेल्या ग्रामस्थांनी शासनाचे लाभ मिळाल्या बद्दल आभार व्यक्त केले.यावेळी आयुष्यमान भारत कार्ड वाटप, सामान्य आरोग्य तपासणी व रक्त तपासणी, टीबी मुक्त शपथ, केंद्र व राज्य सरकार लाभार्थी मनोगत, शासकीय योजनांची माहिती, गॅस सिलिंडर व शेगडी वाटप आदी विविध कार्यक्रम संपन्न झाले.
ग्रामपंचायत बिळवसने बचत गटातील महिलांना व्यवसाय पूरक साहित्य दिल्यामुळे बचत गटाच्या सी.आर.पी सौ. अमृता आनंद पालव यांनी ग्रामंचायतीचे आभार मानले. शासनाने बांधकाम कागारांसाठी केलेल्या योजनेमुळे बिळवस गावचे ग्रामस्थ श्री. लक्ष्मण भाऊ पालव यांना आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी कशा प्रकारे फायदा झाला या बाबत माहिती दिली. माजी मुख्याध्यापक सूर्यकांत पालव यांनी ग्रामस्थांना मोलाचे मार्गदर्शन केले.
ग्रा. सदस्य संतोष पालव, सौ. रजंना पालव, ग्रामसेवक युगल प्रभुगावकर, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.