30.8 C
Mālvan
Saturday, April 5, 2025
IMG-20240531-WA0007

हे केंद्र तर पर्ससीन मच्छिमारांच्या सोयीसाठी ; मालवण मक्रेबाग किनाऱ्यावरील प्रस्तावित मासळी उतरवणी केंद्राला पारंपरिक मच्छिमारांचा विरोध.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण समुद्र किनाऱ्यावरील मक्रेबाग दांडी आवार येथे मंजूर असलेल्या प्रस्तावित मासळी उतरवणी केंद्राच्या बांधकामाबाबत आज मत्स्य विभागाचे अधिकारी मच्छिमारांच्या प्रतिक्रिया घ्यायला किनाऱ्यावर गेले तेंव्हा या केंद्राच्या बांधकामाला पारंपारिक मच्छिमारांनी विरोध दर्शवीला. या केंद्राच्या उभारणीमुळे मालवण ते दांडी किनारपट्टीचे दोन भाग होणार असून किनाऱ्यावरून मच्छिमारांच्या व पर्यटकांच्या वाहतुकीलाही अडथळा निर्माण होणार आहे, असे म्हणणे पारंपारिक मच्छिमारांनी मांडत हे केंद्र पर्ससीन मच्छिमारांच्या फायद्यासाठी बांधले जात असल्याचा आरोप करत या कामास विरोध दर्शवत विरोध असलेल्या मच्छिमारांच्या सह्यांचे पत्र मत्स्य अधिकाऱ्यांना देण्यात आले.

केंद्र शासनामार्फत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजने अंतर्गत मालवण किनाऱ्यावरील मक्रेबाग – दांडी आवार येथे मासळी उतरवणी केंद्राचे बांधकाम मंजूर आहे. या प्रस्तावित मासळी उतरवणी केंद्राच्या नकाशाचे अवलोकन स्थानिक मच्छिमारांना करून देण्यासाठी व त्यांचे अभिप्राय घेण्यासाठी आज मालवण येत सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयामार्फत मच्छिमार व मच्छिमार सोसायटी सदस्यांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार आज सकाळी अकरा वाजता मक्रेबाग किनाऱ्यावर मच्छिमार जमले असता मत्स्य परवाना अधिकारी मुरारी भालेकर यांनी मच्छिमारांना या बांधकामाचा नकाशा दाखवत माहिती दिली. यावेळी छोटू सावजी, सन्मेष परब, भाऊ मोर्जे, जगदीश खराडे, अन्वय प्रभू, अक्षय रेवंडकर, रुपेश प्रभू, महेश कोयंडे आदी व इतर मच्छिमार उपस्थित होते.

मत्स्य अधिकाऱ्यांनी या मासळी उतरवणी केंद्राबाबत माहिती दिल्यावर पारंपारिक मच्छिमारांनी या केंद्राला विरोध दर्शवीला. मक्रेबाग येथील स्मशानाच्या समोरील भागापासून बांधण्यात येणाऱ्यां या केंद्राचे बांधकाम समुद्राच्या ओहोटी रेषेपर्यंत जाणार असल्याने मालवण बंदर जेटी ते दांडी या किनाऱ्याचे दोन भाग होणार आहेत. या किनाऱ्यावर मच्छिमारांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते तसेच दांडी येथे मोठ्या प्रमाणावर जलपर्यटन होत असल्याने या किनाऱ्यावरून पर्यटकांचीही मोठी वर्दळ असते. हे केंद्र झाल्यास किनाऱ्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होणार आहे. तसेच या केंद्राचे प्रवेशद्वारही चुकीच्या पद्धतीने दाखविण्यात आले असे उपस्थित पारंपारिक मच्छिमारांनी सांगत हे केंद्र पर्ससीन मच्छिमारांच्या सोयीसाठी त्यांना मासे उतरविण्यासाठी बांधण्यात येत आहे असा आरोप मच्छिमारांनी केला.

यावर मत्स्य परवाना अधिकारी मुरारी भालेकर यांनी वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी केंद्रामधून रस्त्याची व्यवस्था करण्यात येणार आहे, त्यासाठी स्लोप बांधण्यात येतील, असे सांगितले. मात्र बांधकामाच्या नकाशामध्ये आणि अधिकाऱ्यांच्या तोंडी माहिती मध्ये तफावत असल्याचे मच्छिमारांनी सांगत या केंद्राच्या उभारणीस आपला विरोध असल्याचे स्पष्ट केले. यावेळी विरोध असलेल्या मच्छिमारांच्या सह्यांचे पत्र अधिकारी श्री. भालेकर यांच्याकडे देण्यात आले. मच्छिमारांचेअरमन अभिप्राय व केंद्रास असलेला विरोध वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात येईल, असे भालेकर यांनी सांगितले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण समुद्र किनाऱ्यावरील मक्रेबाग दांडी आवार येथे मंजूर असलेल्या प्रस्तावित मासळी उतरवणी केंद्राच्या बांधकामाबाबत आज मत्स्य विभागाचे अधिकारी मच्छिमारांच्या प्रतिक्रिया घ्यायला किनाऱ्यावर गेले तेंव्हा या केंद्राच्या बांधकामाला पारंपारिक मच्छिमारांनी विरोध दर्शवीला. या केंद्राच्या उभारणीमुळे मालवण ते दांडी किनारपट्टीचे दोन भाग होणार असून किनाऱ्यावरून मच्छिमारांच्या व पर्यटकांच्या वाहतुकीलाही अडथळा निर्माण होणार आहे, असे म्हणणे पारंपारिक मच्छिमारांनी मांडत हे केंद्र पर्ससीन मच्छिमारांच्या फायद्यासाठी बांधले जात असल्याचा आरोप करत या कामास विरोध दर्शवत विरोध असलेल्या मच्छिमारांच्या सह्यांचे पत्र मत्स्य अधिकाऱ्यांना देण्यात आले.

केंद्र शासनामार्फत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजने अंतर्गत मालवण किनाऱ्यावरील मक्रेबाग - दांडी आवार येथे मासळी उतरवणी केंद्राचे बांधकाम मंजूर आहे. या प्रस्तावित मासळी उतरवणी केंद्राच्या नकाशाचे अवलोकन स्थानिक मच्छिमारांना करून देण्यासाठी व त्यांचे अभिप्राय घेण्यासाठी आज मालवण येत सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयामार्फत मच्छिमार व मच्छिमार सोसायटी सदस्यांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार आज सकाळी अकरा वाजता मक्रेबाग किनाऱ्यावर मच्छिमार जमले असता मत्स्य परवाना अधिकारी मुरारी भालेकर यांनी मच्छिमारांना या बांधकामाचा नकाशा दाखवत माहिती दिली. यावेळी छोटू सावजी, सन्मेष परब, भाऊ मोर्जे, जगदीश खराडे, अन्वय प्रभू, अक्षय रेवंडकर, रुपेश प्रभू, महेश कोयंडे आदी व इतर मच्छिमार उपस्थित होते.

मत्स्य अधिकाऱ्यांनी या मासळी उतरवणी केंद्राबाबत माहिती दिल्यावर पारंपारिक मच्छिमारांनी या केंद्राला विरोध दर्शवीला. मक्रेबाग येथील स्मशानाच्या समोरील भागापासून बांधण्यात येणाऱ्यां या केंद्राचे बांधकाम समुद्राच्या ओहोटी रेषेपर्यंत जाणार असल्याने मालवण बंदर जेटी ते दांडी या किनाऱ्याचे दोन भाग होणार आहेत. या किनाऱ्यावर मच्छिमारांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते तसेच दांडी येथे मोठ्या प्रमाणावर जलपर्यटन होत असल्याने या किनाऱ्यावरून पर्यटकांचीही मोठी वर्दळ असते. हे केंद्र झाल्यास किनाऱ्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होणार आहे. तसेच या केंद्राचे प्रवेशद्वारही चुकीच्या पद्धतीने दाखविण्यात आले असे उपस्थित पारंपारिक मच्छिमारांनी सांगत हे केंद्र पर्ससीन मच्छिमारांच्या सोयीसाठी त्यांना मासे उतरविण्यासाठी बांधण्यात येत आहे असा आरोप मच्छिमारांनी केला.

यावर मत्स्य परवाना अधिकारी मुरारी भालेकर यांनी वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी केंद्रामधून रस्त्याची व्यवस्था करण्यात येणार आहे, त्यासाठी स्लोप बांधण्यात येतील, असे सांगितले. मात्र बांधकामाच्या नकाशामध्ये आणि अधिकाऱ्यांच्या तोंडी माहिती मध्ये तफावत असल्याचे मच्छिमारांनी सांगत या केंद्राच्या उभारणीस आपला विरोध असल्याचे स्पष्ट केले. यावेळी विरोध असलेल्या मच्छिमारांच्या सह्यांचे पत्र अधिकारी श्री. भालेकर यांच्याकडे देण्यात आले. मच्छिमारांचेअरमन अभिप्राय व केंद्रास असलेला विरोध वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात येईल, असे भालेकर यांनी सांगितले.

error: Content is protected !!