28.2 C
Mālvan
Friday, October 18, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

रा. ब. अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूल, मालवण यांचा स्वर्गीय एस एस आजगांवकर ताम्रपट व स्व. डाॅ. एस. के. पंतवालावलकर मानपत्र २०२४ वितरण व सत्कार आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न.

- Advertisement -
- Advertisement -

टोपीवाला हायस्कूलचे माजी विद्यार्थी श्री. आनंद सिताराम चव्हाण यांना ताम्रपट तर भारतीय वायूदलातील गृप कॅप्टन श्री. अमेय श्रीनिवास पंडित व श्री. रमण फकीर पाटील यांना मानपत्र प्रदान.

मामा वरेरकर नाट्यगृहातील शानदार सोहळ्याला, संस्थेचे अध्यक्ष शरद परुळेकर, सचिव विजय कामत, मुख्याध्यापक श्री. वळंजू यांच्या सहीत मान्यवर, माजी विद्यार्थी शाळेचे शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनींची उपस्थिती.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या मामा वरेरकर नाट्यगृहात आज १० जानेवारीला सकाळी ११ वाजता रा. ब. अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूल, मालवण यांच्या स्व. एस. एस .आजगांवकर ताम्रपट व स्व. डाॅ. एस. के. पंतवालावलकर मानपत्र २०२४ वितरण व सत्कार आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न झाला. टोपीवाला हायस्कूलचे माजी विद्यार्थी श्री. आनंद सिताराम चव्हाण यांना ताम्रपट तर भारतीय वायूदलातील गृप कॅप्टन श्री. अमेय श्रीनिवास पंडित व श्री. रमण फकीर पाटील मानपत्र प्रदान करण्यात आले. गृप कॅप्टन श्री अमेय श्रीनिवास पंडित व श्री. रमण फकीर पाटील हे एकाच १९९२ एस एस सी. बॅचचे माजी विद्यार्थी आहेत.

सकाळी १०;३० वाजता सुरू झालेल्या या सोहळ्याची सुरवात सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने व ईशस्तवनाने झाली. स्वागत कवितेने उपस्थित मान्यवर माजी विद्यार्थी विद्यार्थिनी आणि इतर सर्वांचे स्वागत करण्यात आले. प्रशालेच्या शिक्षिका सौ. भिसे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. शरद महादेव परुळेकर यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर ताम्रपट सत्कार मूर्ती श्री आनंदकुमार सिताराम चव्हाण, गृप कॅप्टन श्री अमेय श्रीनिवास पंडित व श्री. रमण फकीर पाटील यांचा अनुक्रमे श्री अविनाश आजगांवकर, श्री गुरुनाथ सामंत व संस्थेचे सचिव श्री. विजय कामत यांनी परिचय करून दिला.
या वेळी गृप कॅप्टन श्री अमेय श्रीनिवास पंडित यांच्या कारकीर्दीविषयी छोटी चित्रफित उपस्थितां समोर सादर झाली.

अध्यक्ष श्री. शरद महादेव परुळेकर यांच्या हस्ते श्री आनंदकुमार सिताराम चव्हाण यांना ताम्रपट प्रदान करण्यात आले. सध्या देशसेवेत व्यस्त असलेला गृप कॅप्टनश्री अमेय श्रीनिवास पंडित हे कार्यबाहुल्यामुळे सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाहीत.
गृप कॅप्टन श्री अमेय श्रीनिवास पंडित यांच्या वतीने त्याच्या मातोश्री श्रीमती वैशाली श्रीनिवास पंडित यांनी मानपत्र स्विकारले तर श्री. रमण फकीर यांना श्री. शरद महादेव परुळेकर यांच्या हस्ते मानपत्र प्रदान करण्यात आले. ताम्रपट वाचन शिक्षक श्री बर्वे व मानपत्र वाचन सौ. रावराणे यांनी केले. मालवणातील काही व्यक्ति व संस्था, लायन्स क्लब ऑफ मालवण यांनी देखील ताम्रपट व मानपत्र प्राप्त मान्यवरांचा सन्मान केला.

यानंतर शाळेचे श्री पांडुरंग पु. सरनाईक नैपुण्य पदक तथा अन्य प्रातिनिधीक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. यानंतर सत्कार मूर्ती ताम्रपट गौरव प्राप्त श्री आनंदकुमार सिताराम चव्हाण, श्री. रमण फकीर पाटील यांनी सत्काराला उत्तर देताना उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनींधा मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. गृप कॅप्टन श्री अमेय श्रीनिवास पंडित यांनी व्हिडिओ संदेवाद्वारे त्यांचे शालेय अनुभव सांगितले. श्री रमण पाटील यांनी विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी SWAT पृथःक्करण आणि भावी भारताची क्षमता याविषयी मार्गदर्शन केले व आपल्या सर्व गुरूजन व शाळेला मंचावरून सविनय दंडवत समर्पित केला. त्यांनी संस्थेचे, प्रशालेचे आभार मानले. गृप कॅप्टन श्री अमेय श्रीनिवास पंडित यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे मनोगत व शाळा आणि संस्थेविषयी कृतज्ञता व्यक्त केली. या दरम्यान संस्थेचे अध्यक्ष शरद परुळेकर यांच्या हस्ते हस्तलिखित ज्ञानज्योतीचे प्रकाशन करण्यात आले. शरद महादेव परुळेकर यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या उपक्रमांचा आढावा घेतला.

टोपीवाला हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री वळंजू यांनी या सोहळ्याला उपस्थित मान्तवर व सर्व घटकांचे तसेच सहकारी व्यक्ती संस्था यांचे व नगरपरिषद मालवण यांचे आभार मानले. शिक्षिका सौ धामापूरकर यांनी पसायदान सादर केले व सोहळ्याची सांगता झाली.

या सोहळ्याला संस्थेचे सक्रीय घटक तथा कार्याध्यक्ष श्री दिगंबर सामंत यांची विशेष मार्गदर्शनपर उपस्थिती होती तर बॅरिस्टर नाथ पै सेवांगण अध्यक्ष लक्ष्मीकांत खोबरेकर उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!