मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील माऊली मित्रमंडळ व संलग्न मित्रमंडळांचे संस्थापक राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या कणकवली येथील लक्ष्मी नारायण निवास, कांबळे गल्ली, बाबा भालचंद्र नगर, गणपती साना येथील निवासस्थानी आज ५ जानेवारीला श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. (प्रतिवर्षी श्रावण महिन्यात ही पूजा संपन्न होते.)
या निमित्ताने राजेंद्र मनोहर पेडणेकर व कुटुंबायांनी यांनी जिल्ह्यातील पत्रकार मित्र, पोलिस बांधव, सामाजिक कार्यकर्ते, संलग्न मित्रमंडळ सदस्य व नागरिकांना तीर्थ प्रसादासाठी सस्नेह निमंत्रण दिले आहे .