वैभववाडी | प्रतिनिधी : वैभववाडी राष्ट्रवादी अजित पवार गटाची कार्यकारणी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक,कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांच्या मान्यतेने जाहीर करण्यात आली. तालुका उपाध्यक्षपदी संकेत सावंत,अनंत पवार, सरचिटणीसपदी अजित शिंदे, चिटणीसपदी शशी मद्रस, अक्षय पंडित, खजिनदार पदी अमोल आमकार, सचिव पदी तुषार कर्पे, तालुका प्रतीनिधी म्हणून गणेश पवार,राज तळेकर, शैलेश साळवी, निलेश पवार, सुरेश खोपडे, रमेश पाटील, प्रसाद आमकर यांची नियुक्ती तालुकाध्यक्ष वैभव रावराणे यांनी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भक्कम करण्यासाठी कार्यकारणीत तरुणांना मोठी संधी देण्यात आली आहे. लवकरच तालुक्यातील सर्व गावांसह वाडीवाडीत दौरा करणार. नूतन वर्षात जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांच्या उपस्थित कार्यकर्ता मेळावा व अनेक प्रवेश घेणार. असे तालुकाध्यक्ष वैभव रावराणे यांनी जाहीर केले.
वैभववाडी राष्ट्रवादी अजित पवार गटाची कार्यकारणी जाहीर.
133
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -