कुडाळ | देवेंद्र गावडे ( उपसंपादक ) : नेरूर ग्रामसेवा मंडळ मुंबई संचलित श्री कलेश्वर विद्यामंदिर नेरूर हायस्कुलला ६० व्या वर्षपूर्ती निमित्त हिरक महोत्सव सोहळा खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी मान्यवर व शाळेसाठी सहकार्य केलेल्या नागरिकांचा सत्कार करण्यात आला. आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून ५ लाख रु निधीतून श्री कलेश्वर विद्यामंदिर हायस्कूलला संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. तसेच खासदार विनायक राऊत, खासदार अनिल देसाई यांच्या माध्यमातून १० लाख रु. निधीतून नवीन वर्गखोली बांधण्यात आली. या दोन्ही कामांची उद्घाटने खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आली. यापुढेही हायस्कूलसाठी लागणारे सर्वोतपरी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी शिवसेना उपनेत्या जान्हवी सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, मुंबईचे माजी नगरसेवक कमलाकर नाईक, नेरूर विभाग प्रमुख शेखर गावडे, सरपंच भक्ती घाडी, उपसरपंच दत्ता म्हाडदळकर, शालेय समिती अध्यक्ष प्रदीप नाईक, मुख्याध्यापक श्रीम. नाईक, ग्रा. पं. सदस्य गणेश गावडे, निकिता सडवेलकर, अरुणा चव्हाण, मंजुनाथ फडके, संतोष कुडाळकर,रोशनी नाईक, सुचिता नेरुरकर, समीर नाईक, प्रभाकर गावडे, रोहिदास चव्हाण, विजय लाड, नरेंद्र नाईक यांसह शिक्षक शिक्षकेत्तर कमर्चारी, आजी माजी विद्यार्थीं, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.