28.6 C
Mālvan
Friday, October 18, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

कणवलीतील नेत्रालयात शस्त्रक्रिया केल्यानंतर रुग्णाची नजर गेल्याची धक्कादायक घटना ; आ. वैभव नाईक यांनी नेत्रालयावर धडक देत जाब विचारून झाल्यावर नेत्रालयाने केले ‘शटर डाऊन.’

- Advertisement -
- Advertisement -

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या सुकळवाड येथील शंकर टेबुलकर या नेत्र रुग्णाच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया केल्यानंतर त्या रुग्णाची नजरच गेल्याची धक्कादायक घटना घडली.

ही बाब निदर्शनास आल्यानंतर कणकवलीत त्या नेत्रालयाच्या कार्यालयात आमदार वैभव नाईक यांनी या रुग्णाच्या नातेवाईकांसह धडक देत नेत्रालय प्रशासन व्यवस्थापनाच्या पूनम जगदाळे यांना जाब विचारला. या रुग्णाचे ऑपरेशन केलेल्या डॉक्टरांसह प्रमुख जबाबदार अधिकाऱ्यानी उद्या या रुग्णाच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांना नुकसान भरपाई द्या. तसेच या प्रकरणी या संबंधित दोशींवर कारवाई करा या मागणीसाठी शल्य चिकित्सकांकडे तक्रार करण्यात येणार असल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली. यावेळी आमदार वैभव नाईक यांच्यासह युवा सेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, युवा सेना उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर, रुपेश आमडोस्कर आदि उपस्थित होते.

यावेळी नेत्रालय प्रशासनावर अक्षरशः प्रश्नांचा भडिमार करत जिल्हा रुग्णालयात ३ हजारात होणारी शस्त्रक्रियेला २७ हजार कसे लागतात? असा सवाल देखील उपस्थित करण्यात आला. दरम्यान आमदार वैभव नाईक यांनी या नेत्रालयावर धडक दिल्यानंतर नेत्रालयाचे शटर बंद करण्यात आले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या सुकळवाड येथील शंकर टेबुलकर या नेत्र रुग्णाच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया केल्यानंतर त्या रुग्णाची नजरच गेल्याची धक्कादायक घटना घडली.

ही बाब निदर्शनास आल्यानंतर कणकवलीत त्या नेत्रालयाच्या कार्यालयात आमदार वैभव नाईक यांनी या रुग्णाच्या नातेवाईकांसह धडक देत नेत्रालय प्रशासन व्यवस्थापनाच्या पूनम जगदाळे यांना जाब विचारला. या रुग्णाचे ऑपरेशन केलेल्या डॉक्टरांसह प्रमुख जबाबदार अधिकाऱ्यानी उद्या या रुग्णाच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांना नुकसान भरपाई द्या. तसेच या प्रकरणी या संबंधित दोशींवर कारवाई करा या मागणीसाठी शल्य चिकित्सकांकडे तक्रार करण्यात येणार असल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली. यावेळी आमदार वैभव नाईक यांच्यासह युवा सेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, युवा सेना उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर, रुपेश आमडोस्कर आदि उपस्थित होते.

यावेळी नेत्रालय प्रशासनावर अक्षरशः प्रश्नांचा भडिमार करत जिल्हा रुग्णालयात ३ हजारात होणारी शस्त्रक्रियेला २७ हजार कसे लागतात? असा सवाल देखील उपस्थित करण्यात आला. दरम्यान आमदार वैभव नाईक यांनी या नेत्रालयावर धडक दिल्यानंतर नेत्रालयाचे शटर बंद करण्यात आले.

error: Content is protected !!