नवलराज काळे | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुका व्यापारी संघटनेच्या अध्यक्ष पदी तेजस आंबेरकर यांची निवड करण्यात आली आहे. व्यापारी संघटनेची
वार्षिक सर्वसाधारण सभा आज संजय सावंत यांच्या निवासस्थानी संपन्न झाली.
यावेळी ३ वर्षाकरीता नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली.
कार्यकारणी पुढील प्रमाणे : अध्यक्ष – श्री. तेजस मनोहर आंबेकर, उपाध्यक्ष-श्री.अरविंद गाड व श्री. प्रल्हाद पावले. खजिनदार- श्री. नितीन महाडीक तर सचिव पदी श्री. सुरेंद्र नारकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सदर मिटींगला माजी अध्यक्ष रत्नाकर कदम, श्री.टी.एस.घोणे, श्री. मनोज सावंत, श्री. संजय लोके. जिल्हा कार्यकारीणी सदस्य श्री.संतोष कुडाळकर. माजी जिल्हा सेक्रेटरी श्री.संजय सावंत. तसेच कार्यकारीणी सदस्य-तुकाराम प्रभु. संतोष तळेकर, अवधुत माईणकर, रविंद्र पाटील, मनोज मानकर, राकेश कुडतरकर, विजय लोके, रविंद्र मोरे, संतोष कोलते, दीपक माईणकर आदी ऊपस्थित होते.