भव्य बक्षिसांची असणार रेलचेल ; विवाहित महिलांना भव्य व्यासपीठ देणार्या सुप्रसिद्ध क्रिएटीव्ह सखी गृपचे दशकपूर्ती वर्ष.
बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या बांदा येथील क्रिएटिव्ह सखी गृप’ स्वानंद सुंदरी स्पर्धा १३ जानेवारीला आयोजित करण्यात आली असल्याची माहिती क्रिएटिव्ह साठी गृपच्या अध्यक्ष सौ. अंकिता स्वार, सौ. रूपाली शिरसाट, सौ. रिया वाळके यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केली. यावेळी वंदना पावसकर, सावली कामत, श्रुती वळंजु, अमिता स्वार, मृणाल तोरस्कर, उज्वला महाजन, सोनाली राणे, श्रुती शिरोडकर, नेहा पावसकर उपस्थित होत्या.
क्रिएटिव्ह सखी गृप गेली दहा वर्ष महिलांसाठी विविध उपक्रम राबवत आहेत. महिलांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सर्वप्रथम क्रिएटिव्ह सखी गृप मे अविष्कार तारकांचा हा कार्यक्रम केला होता या कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला होता. क्रिएटीव्ह सखी गृप नेहमीच सांस्कृतिक तसेच सामाजिक कार्यक्रम राबवत आहेत. यामध्ये पूरग्रस्तांसाठी मदत संविता आश्रमासाठी आश्रम मध्ये मदत असे विविध सामाजिक कार्यक्रम या क्रिटी ग्रुपच्या माध्यमातून राबवण्यात आले. असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. चार वर्षाच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर क्रिएटिव्ह सखी गृप बांदा, पुन्हा एकदा खास विवाहित महिलांसाठी स्वानंद सुंदरी स्पर्धा व त्याचबरोबर खास विवाहित महिलांसाठी गृप डान्स स्पर्धा घेण्यात येईल. मंडळाचे हे दशकपूर्ती वर्ष असल्यामुळे यावेळी सर्व कार्यक्रम भव्य स्वरुपात करण्याचा मानस क्रिएटिव्ह सखी ग्रुपचा आहे.
एक वेगळ आकर्षण म्हणून खास आई आणि मुलांसाठी म्हणून मॉम्स अँड चाइल्ड ही स्पर्धा घेण्यात येईल.यावेळी या कार्यक्रमाचे स्वरूप सिंधुदुर्ग आणि गोवा पूरते मर्यादित न ठेवता इतर राज्यांसाठी पण खुले करण्यात येत आहे. स्वानंद सुंदरी स्पर्धेसाठी विविध पारितोषिके ठेवण्यात आले आहेत. प्रत्येकी प्रथम क्रमांक रुपये दहा हजार व क्राऊन, द्वितीय क्रमांक रुपये सात हजार, तृतीय क्रमांक रुपये पाच हजार.
मॉम्स अँड चाइल्ड स्पर्धा पारितोषिके, रुपये २५०० व ट्रॉफी, द्वितीय क्रमांक रुपये २०००, तृतीय क्रमांक रुपये दीड हजार.
महिलांसाठी ग्रुप डान्स स्पर्धा पारितोषिके, प्रथम क्रमांक रुपये ३००० व ट्रॉफी, द्वितीय क्रमांक रुपये २००० व ट्रॉफी, तृतीय क्रमांक रुपये दीड हजार व ट्रॉफी. ही स्पर्धा १३ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी सात वाजता, विठ्ठल रखुमाई हॉल, गांधी चौक ,बांदा येथे आयोजित केली गेली आहे. इच्छुक स्पर्धकांनी आपली नावे दिनांक २५ डिसेंबर पर्यंत खालील नंबर वर द्यावीत. सदरची स्पर्धा हि फक्त विवाहित महिलांसाठी असेल.अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
(संपर्क क्रमांक 9421148814, 9923869205, 9422079515, 9421036184, 9404497292 )