28.9 C
Mālvan
Monday, December 2, 2024
IMG-20240531-WA0007

बाल्कनी..!

- Advertisement -
- Advertisement -

( क्रमशः कथा = भाग : १ )

मधु सानेंची पत्नी जाऊन दहा वर्ष झाली होती. मुलं बाळं नसल्याने आणि फारसे सामाजिक संबंध जोडले नसल्याने त्यांच्या घरांत किंवा अगदी दारातही पेपरवाला सोडला तर फारसा कोणाचा वावर नसायचा. पत्नीच्या निधनानंतर काही दिवस त्यांच्या ऑफिसमधील लोकं येऊन गेली आणि त्यानंतर व्ही आर.एस घेऊन मधु सानेंनी ऑफिसचाही स्वतःहून निरोप घेतला होता. सकाळी स्वतःच गजर लावून उठणे, दूध – पाव आणणे हा त्यांचा शिरस्ता होता…जो कायम चालू होता. त्यांची अपर्टमेंटची इमारत ही शहरातील मुख्य भागात असली तरी ती धड नवीन नाही की धड जुनी नाही अशी होती. चार कुटुंबाची इमारत ज्यातील तीन कुटुंब आता शहर सोडून दुसरीकडे गेलेली आणि एक एकटे मधु साने…!

सकाळी एकट्याने चालणे, रोज एखादी ताजी भाजी आणणे, दूध आणून चहा व नंतर नाष्टा वगैरे न करता थेट दुपारी पेपर वाचत वाचत बाल्कनीत बसून जेवण असा त्यांचा दिनक्रम बनलेला होता. त्यांच्या बाल्कनीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात लख्ख प्रकाश यायचा, गाड्यांचे-माणसांचे आवाज यायचे, वर्दळ जाणवायची परंतु त्या बाल्कनी समोरील एका मोठ्या इमारतीमुळे काही दिसायचे नाही. अगदीच बाल्कनीत बसून उभे राहीलं तर इमारतीच्या फाटकाचे दर्शन व्हायचे…त्यातून कोण कधी रद्दीवाला, भंगारवाला वगैरे नजरेस पडायचा. पावसाळ्यात मात्र त्यांच्या इमारतीच्या आवारात अनेक जण आडोशाला आलेले दिसायचे तिच काही ती बाल्कनीतून दिसणारी माणसांची वर्दळ होती. गेली काही वर्षे रोज संध्याकाळी लुंगी व सदरा घालून जवळच पाय मोकळे करायला जाऊन येताना खमंग अशी भजी किंवा तवा पुलाव असे काहीतरी पार्सल आणून नंतर रात्री आठ ते दहा किंवा अकरा बाल्कनीत बसून टेप रेकाॅर्डरवरील गाणी ऐकत झोपणे ही देखील त्यांच्या जीवनाची एक नित्यता बनून गेली होती. कधी कधी तर पहाटे दोनला उठून जेवणे असाही त्यांचा प्रकार होत होता पण सकाळी पाच वाजता अचूक ते आंघोळ करुन व पत्नीच्या फोटोसमोर दिवा लावल्याशिवाय त्यांचा एकही दिवस गेला नव्हता. पत्नीचा फोटोही बाल्कनीतच लावलेला होता जेणेकरून तिला मोकळा श्वास मिळत राहील असा मधु साने यांचा समज होता.

एकटेपणाबद्दल त्यांना स्वतःची कीव येत होती. हल्ली पेन्शनसाठी सोडले तर ते कुठल्या बॅन्क किंवा कचेरीत गेले नव्हते. दहा वर्षात दोनदा घराला रंग काढला होता तेंव्हा रंगकाम करायला आलेल्या चार माणसांचीही गर्दी कधी एकदा जाईल असे त्यांना झाले होते. त्यांना माणसांबद्दल घृणा नव्हती परंतु माणसांमध्ये कसे व का मिसळायचे याचे गणित त्यांना बालपणीपासूनच सुटलेले नव्हते. वसतीगृहात विद्यार्थी विद्यार्थिनींसोबत कसे बसे शिक्षण व नंतर नोकरीत स्वतंत्र केबीन असल्याने त्यांना त्यांची पत्नी सोडली तर माणसांसोबत सलग असे कधीच रहावे लागले नव्हते.

सकाळी घराबाहेर पडताना फक्त ते त्यांच्या बाल्कनीकडे बघून म्हणायचे….,” येतो थोडा चालून….येताना दूध व भाजी आणतो…!” रोज बाल्कनीला निरोप देताना आपण तिला पुन्हा पाहू की नाही….आपण तिच्यातून पुन्हा बाहेर पाहू की नाही आणि तिला पुन्हा निरोप द्यायला उद्या असू की नाही अशी त्यांची तगमग होत असे. फिरून येताना शहरातील नदीवरच्या पुलावर दोन मिनिटे उभे रहाताना त्यांना रोज पुलाखालील खोल पाणी व त्याच्या तळाचे आकर्षण वाटायचे. सगळं संपवून शांत खोल निद्रीस्त व्हावेसे वाटायचे परंतु मग रोज त्यांना त्यांची ‘बाल्कनी’ आठवायची….जी त्यांची वाट बघत असेल अशी खात्री वाटत ते झपाझप पावलं टाकत दूध, भाजी घेऊन पुन्हा घरी यायचे….बाल्कनीत एक दीर्घ श्वास घ्यायचे.!

(क्रमशः) (काल्पनिक कथा )

लेखक : सुयोग पंडित, सिंधुदुर्ग.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

( क्रमशः कथा = भाग : १ )

मधु सानेंची पत्नी जाऊन दहा वर्ष झाली होती. मुलं बाळं नसल्याने आणि फारसे सामाजिक संबंध जोडले नसल्याने त्यांच्या घरांत किंवा अगदी दारातही पेपरवाला सोडला तर फारसा कोणाचा वावर नसायचा. पत्नीच्या निधनानंतर काही दिवस त्यांच्या ऑफिसमधील लोकं येऊन गेली आणि त्यानंतर व्ही आर.एस घेऊन मधु सानेंनी ऑफिसचाही स्वतःहून निरोप घेतला होता. सकाळी स्वतःच गजर लावून उठणे, दूध - पाव आणणे हा त्यांचा शिरस्ता होता…जो कायम चालू होता. त्यांची अपर्टमेंटची इमारत ही शहरातील मुख्य भागात असली तरी ती धड नवीन नाही की धड जुनी नाही अशी होती. चार कुटुंबाची इमारत ज्यातील तीन कुटुंब आता शहर सोडून दुसरीकडे गेलेली आणि एक एकटे मधु साने…!

सकाळी एकट्याने चालणे, रोज एखादी ताजी भाजी आणणे, दूध आणून चहा व नंतर नाष्टा वगैरे न करता थेट दुपारी पेपर वाचत वाचत बाल्कनीत बसून जेवण असा त्यांचा दिनक्रम बनलेला होता. त्यांच्या बाल्कनीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात लख्ख प्रकाश यायचा, गाड्यांचे-माणसांचे आवाज यायचे, वर्दळ जाणवायची परंतु त्या बाल्कनी समोरील एका मोठ्या इमारतीमुळे काही दिसायचे नाही. अगदीच बाल्कनीत बसून उभे राहीलं तर इमारतीच्या फाटकाचे दर्शन व्हायचे…त्यातून कोण कधी रद्दीवाला, भंगारवाला वगैरे नजरेस पडायचा. पावसाळ्यात मात्र त्यांच्या इमारतीच्या आवारात अनेक जण आडोशाला आलेले दिसायचे तिच काही ती बाल्कनीतून दिसणारी माणसांची वर्दळ होती. गेली काही वर्षे रोज संध्याकाळी लुंगी व सदरा घालून जवळच पाय मोकळे करायला जाऊन येताना खमंग अशी भजी किंवा तवा पुलाव असे काहीतरी पार्सल आणून नंतर रात्री आठ ते दहा किंवा अकरा बाल्कनीत बसून टेप रेकाॅर्डरवरील गाणी ऐकत झोपणे ही देखील त्यांच्या जीवनाची एक नित्यता बनून गेली होती. कधी कधी तर पहाटे दोनला उठून जेवणे असाही त्यांचा प्रकार होत होता पण सकाळी पाच वाजता अचूक ते आंघोळ करुन व पत्नीच्या फोटोसमोर दिवा लावल्याशिवाय त्यांचा एकही दिवस गेला नव्हता. पत्नीचा फोटोही बाल्कनीतच लावलेला होता जेणेकरून तिला मोकळा श्वास मिळत राहील असा मधु साने यांचा समज होता.

एकटेपणाबद्दल त्यांना स्वतःची कीव येत होती. हल्ली पेन्शनसाठी सोडले तर ते कुठल्या बॅन्क किंवा कचेरीत गेले नव्हते. दहा वर्षात दोनदा घराला रंग काढला होता तेंव्हा रंगकाम करायला आलेल्या चार माणसांचीही गर्दी कधी एकदा जाईल असे त्यांना झाले होते. त्यांना माणसांबद्दल घृणा नव्हती परंतु माणसांमध्ये कसे व का मिसळायचे याचे गणित त्यांना बालपणीपासूनच सुटलेले नव्हते. वसतीगृहात विद्यार्थी विद्यार्थिनींसोबत कसे बसे शिक्षण व नंतर नोकरीत स्वतंत्र केबीन असल्याने त्यांना त्यांची पत्नी सोडली तर माणसांसोबत सलग असे कधीच रहावे लागले नव्हते.

सकाळी घराबाहेर पडताना फक्त ते त्यांच्या बाल्कनीकडे बघून म्हणायचे….," येतो थोडा चालून….येताना दूध व भाजी आणतो…!" रोज बाल्कनीला निरोप देताना आपण तिला पुन्हा पाहू की नाही….आपण तिच्यातून पुन्हा बाहेर पाहू की नाही आणि तिला पुन्हा निरोप द्यायला उद्या असू की नाही अशी त्यांची तगमग होत असे. फिरून येताना शहरातील नदीवरच्या पुलावर दोन मिनिटे उभे रहाताना त्यांना रोज पुलाखालील खोल पाणी व त्याच्या तळाचे आकर्षण वाटायचे. सगळं संपवून शांत खोल निद्रीस्त व्हावेसे वाटायचे परंतु मग रोज त्यांना त्यांची 'बाल्कनी' आठवायची….जी त्यांची वाट बघत असेल अशी खात्री वाटत ते झपाझप पावलं टाकत दूध, भाजी घेऊन पुन्हा घरी यायचे….बाल्कनीत एक दीर्घ श्वास घ्यायचे.!

(क्रमशः) (काल्पनिक कथा )

लेखक : सुयोग पंडित, सिंधुदुर्ग.

error: Content is protected !!