26.7 C
Mālvan
Thursday, April 10, 2025
IMG-20240531-WA0007

मालवणात राजकोट मध्ये ‘न भूतो ना भविष्यती..!’ ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्व स्तरांतून व्यक्त होत आहेत आभार.

- Advertisement -
- Advertisement -

असंख्य ज्येष्ठ, युवा मालवण वासियांच्या मनात व डोळ्यांत ‘शिवकृतज्ञता..!’

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे आज
नौदल दिनानिमित्त राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमरी वेषातील भव्य पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी सायंकाळी करण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदी छत्रपती शिवरायांसमोर नतमस्तक झाले. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना देशातील पहिल्या आरमाराचे जनक म्हणून ओळखले जाते. भारतीय नौसेनेने देखील आपल्या ध्वजावर शिवरायांची राजमुद्रा छापली आहे. या पार्श्वभूमीवर नौसेनेच्या वतीने ४ डिसेंबरचा नौसेना दिन छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ले सिंधुदुर्ग च्या साक्षीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला, या निमित्ताने राजकोट किल्ल्यावर नौसेना आणि महाराष्ट्र
शासनाच्या वतीने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी राज्यपाल रमेश बैस, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

मालवणच्या प्रत्येक काना कोपर्यात या न भूतो ना भविष्यती सोहळ्याबद्दल आज ‘शिवकृतज्ञता’ भरभरुन वाहत आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

असंख्य ज्येष्ठ, युवा मालवण वासियांच्या मनात व डोळ्यांत 'शिवकृतज्ञता..!'

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे आज
नौदल दिनानिमित्त राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमरी वेषातील भव्य पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी सायंकाळी करण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदी छत्रपती शिवरायांसमोर नतमस्तक झाले. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना देशातील पहिल्या आरमाराचे जनक म्हणून ओळखले जाते. भारतीय नौसेनेने देखील आपल्या ध्वजावर शिवरायांची राजमुद्रा छापली आहे. या पार्श्वभूमीवर नौसेनेच्या वतीने ४ डिसेंबरचा नौसेना दिन छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ले सिंधुदुर्ग च्या साक्षीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला, या निमित्ताने राजकोट किल्ल्यावर नौसेना आणि महाराष्ट्र
शासनाच्या वतीने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी राज्यपाल रमेश बैस, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

मालवणच्या प्रत्येक काना कोपर्यात या न भूतो ना भविष्यती सोहळ्याबद्दल आज 'शिवकृतज्ञता' भरभरुन वाहत आहे.

error: Content is protected !!