दारुसह पाच लाखाचा मुद्दे माल जप्त
बांदा | राकेश परब : आंबोलीमार्गे कोल्हापूरकडे केल्या जाणार्या बेकायदा गोवा बनावटीच्या दारु वाहतुकी विरोधात इन्सुली एक्साइजने कारवाई केली. या कारवाईत १ लाख रुपयांच्या दारुसह एकूण साडे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. बेकायदा दारु वाहतूक प्रकरणी प्रवेंद्र आत्माराम जांभळे (३१, रा. पेण, रायगड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच दारु वाहतुकीसाठी वापरलेली कार (एमएच ०६ बीएम ५२५२) ताब्यात घेण्यात आली. सदर कारवाई बांदा – दाणोली मार्गावर ओटवणे फाटा येथे आज करण्यात आली.
ही कारवाई जिल्हा अधीक्षक डॉ. बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक टी. बी. पाटील, यु. डी. सावंत, सहाय्यक दुय्यम निरीक्षक पी. बी. देशमुख, जवान आर. डी. ठाकूर, पी. एस. माळी, एन. एम. कलकुटकी, संदिप कदम, ए. जी. जाधव यांच्या पथकाने केली. अधिक तपास तानाजी पाटील करीत आहेत.