मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब येथील रेशन दुकानावर धान्य वितरणातील तांदूळ हे प्लास्टीक सदृश्य असल्याचे आढळल्याचा दावा माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी केला आहे.

चंद्रकांत गोलतकर ( माजी सरपंच, पळसंब)
पळसंब रेशनिंग दुकानावर देण्यात आलेले तांदूळ धान्य हे प्लॉस्टिक सदृश्य असल्याचे आढळत असून ते मानवी जीवनासाठी हानिकारक असल्याने रेशनिंग दुकानांची तपासणी करून, तांदूळ परीक्षण करुन सखोल चौकशी करत कारवाई करण्यात यावी अशी मागणी माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी केली आहे