सुयोग पंडित | मुख्य संपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या चौके येथील पेट्रोल पंपासमोरील एका हाॅटेल व्यावसायिकाला पाहिले की एका धाकड व हरहुन्नरी मराठी माणसाचा अस्सल चेहरा दिसतो. अर्थात् तो त्या हाॅटेलच्या मालकांचाच म्हणजे श्री. विनोद सांडव यांचा असतो. चौके, आंबेरी परिसरातील रांगड्या लाल मातीतले हे एक गतीशील मालवणी रसायन उद्योजकतेच्या धाडसाचे आणि सामाजिक कृतीशिलतेच्या ध्यासाचे म्हणून देखिल परिचीत आहे.
श्री. विनोद सांडव हे सामान्य पारिवारीक पार्श्वभूमी असलेले व्यक्तिमत्व असले तरी ‘सामान्यपणे’ जगणे त्यांच्या वृत्तीत नाही त्यामुळे बाल व युवा अवस्थेतूनच त्यांची प्रत्येक कृती ही ‘वेगळी’ ठरत गेली. सर्वसामान्य माणसे करतात तिच कामे विनोद यांनी त्यांचा असा एक वेगळा ठसा उमटवत सुरू केली. या दरम्यान व्यावसायिक प्रयत्नांना यश येत गेले किंवा नाही याचा विचार न करता त्यांनी स्वतःतील ऊर्जेला कधीच थांबू दिले नाही हे विशेष..!
दिड दशकापूर्वी राजकिय पटलावर देखिल काहीतरी ठोस करायच्या त्यांच्या उद्देशामुळे मालवण तालुका व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘परिणामकारक माणसांशी’ त्यांची माणुसकीची जोडणी होऊ लागली आणि नुसत्या विनोदचा एक प्रगल्भ श्री विनोद सांडव नांवाचा ब्रॅन्ड बनू लागला. लोकांसाठी वेळ काढणे ही गोष्ट सोपी नसते हे जाणल्यानंतर त्यांनी व्यावसायिक, संघटनात्मक व कौटुंबिक असा एक संयमी आकृतीबंध तयार केला ज्यामुळे त्यांना त्यांच्या प्रत्येक कृतीचा मागोवा घेताना व स्वतःचा अभ्यास करताना त्रास होत नाही. स्वतः सर्व आघाड्यांवर धडधाकट राहीलो तरच प्रपंच, समाज यासाठी काहीतरी करु शकू असा स्वतःलाच त्यांनी धडा घालून घेतला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातून येऊन आणि जन्मजात असे कुठलेही कुठलेही पाठबळ नसताना भरीव जीवन जगणारी काही माणसे आहेत त्यात श्री विनोद सांडव हे नांव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.
श्री विनोद सांडव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
आणि ह्या विनोद सांडव यांच्या जीवनाकडे पाहून नक्कीच म्हणता येईल की ‘विनोद…इट्स नाॅट अ जोक…!’
आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल समूह.