माजी ग्रामपंचायत सदस्य बाळा मोरये यांनी काही दिवसांपूर्वी उड्डाणपुलाखालील अवैध दारू विक्री व गैरप्रकारांबाबत वेधले होते लक्ष..!
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या नांदगांव उड्डाणपुलाखालील अवैध दारू विक्री व गैरप्रकारांबाबत काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते व माजी ग्रामपंचायत सदस्य सुरेश उर्फ बाळा मोरये यांनी प्रशासन व शासनाचे लक्ष वेधले होते. आता एका लेखी पत्रा द्वारे त्यांनी आमदार नितेश राणे यांना निवेदन देत नांदगांव उड्डाणपुलाखालील चौकाला ( नांदगांव तिठा ) केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांचे नांव द्यायचे मागणी निवेदन दिले आहे. नांदगाव ग्रामपंचायत येथे त्यांनी हे निवेदन सादर केले असून नांदगांव सरपंच व महामार्ग अभियंता, खारेपाटण यांनाही त्यासाठी त्यांनी तसेच सूचीत करत निवेदीत केले आहे.
सुरेश उर्फ बाळा मोरये यांनी दिलेल्या निवेदनात म्हणले आहे की सिंधुदुर्ग हा वैभवशाली निसर्गरम्य पर्यटन जिल्हा म्हणून निर्मिती करणारे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दादा उर्फ केंद्रीय मंत्री तसेच माजी मुख्यमंत्री मा. श्री नारायणराव राणे (केंद्रीय मंत्री) यांच्या अथक प्रयत्नांचेच ते यश आहे. ते पर्यटन जिल्हा निर्मितीचे शिल्पकार आहेत. नांदगांव हे मध्यवर्ती ठिकाण असून आज महामार्ग उड्डाण पुलामुळे नांदगाव तिठ्याचे वैशिष्ट्य खुलून, मोहक दिसून येत आहे, तरी या उड्डाण पुलाखालील चौकाला मा. श्री. नारायणराव राणे असे नामकरण करून गौरविण्यात येऊन जिल्ह्याला एक अनोखी भेट द्यावी अशी विनंती त्यांनी आमदार नितेश राणे यांना निवेदन देत केली आहे.
एक नांदगांव वासिय म्हणून आपण अतिशय कळकळीची विनंती मी करत आहोत असे सांगत या नामकरण प्रकल्पाला आमदार नितेश राणे चांगले सुसज्ज स्वरूप देतील यात शंकाच नाही अशी आशा व्यक्त केली आहे.