24.6 C
Mālvan
Saturday, November 23, 2024
IMG-20240531-WA0007

मसुरे कावावाडी येथे उज्वला गॅस लाभार्थ्यांना शेगडी- सिलेंडर वितरण.

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे – कावावाडी येथे उज्वला गॅस योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्राप्त झालेल्या गॅस सिलेंडर आणि शेगडीचे वितरण माजी पोलीस पाटील दिगंबर येसजी आणि यशवंत हिंदळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारतात उज्वला गॅस योजना सुरू केली आहे. मसुरे कावाडीतील या योजनेअंतर्गत कनेक्शन मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना मालवण येथे जाऊन शेगडी व सिलेंडर आणणे खर्चिक ठरणार होते. त्यामुळे या लाभार्थ्यांना मसुरे कावावाडी येथे सर्व साहित्य मिळेल अशी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती यशवंत हिंदळेकर यांनी यावेळी दिली. यावेळी
लाभार्थी महिला श्रद्धा वायंगणकर, प्रीती गोलतकर, सुनीता पाटील, सायली पेडणेकर, हृदाली पेडणेकर, पूजा नार्वेकर, पूजा पाटील आदी लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. माजी पोलीस पाटील दिगंबर येसजी, पांडुरंग येसजी, यशवंत हिदळेकर, सतीश मसुरकर, साई पेडणेकर, प्रशांत गोलतकर, किरण पेडणेकर, दर्शीत पेडणेकर, रुची नार्वेकर आदी उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे - कावावाडी येथे उज्वला गॅस योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्राप्त झालेल्या गॅस सिलेंडर आणि शेगडीचे वितरण माजी पोलीस पाटील दिगंबर येसजी आणि यशवंत हिंदळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारतात उज्वला गॅस योजना सुरू केली आहे. मसुरे कावाडीतील या योजनेअंतर्गत कनेक्शन मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना मालवण येथे जाऊन शेगडी व सिलेंडर आणणे खर्चिक ठरणार होते. त्यामुळे या लाभार्थ्यांना मसुरे कावावाडी येथे सर्व साहित्य मिळेल अशी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती यशवंत हिंदळेकर यांनी यावेळी दिली. यावेळी
लाभार्थी महिला श्रद्धा वायंगणकर, प्रीती गोलतकर, सुनीता पाटील, सायली पेडणेकर, हृदाली पेडणेकर, पूजा नार्वेकर, पूजा पाटील आदी लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. माजी पोलीस पाटील दिगंबर येसजी, पांडुरंग येसजी, यशवंत हिदळेकर, सतीश मसुरकर, साई पेडणेकर, प्रशांत गोलतकर, किरण पेडणेकर, दर्शीत पेडणेकर, रुची नार्वेकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!