25.3 C
Mālvan
Monday, December 23, 2024
IMG-20240531-WA0007

राज्य उत्पादन शुल्क कणकवली विभागाची धडक कारवाई

- Advertisement -
- Advertisement -

११ लाखांच्या दारुसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

कणकवली | उमेश परब : कणकवली शहरातील हॉटेल अनंत समोर राज्य उत्पादन शुल्क कणकवलीच्या पथकाने  केलेल्या धडक कारवाईत  आयशर टेम्पोतून होणारी गोवा बनावटीची १० लाख ८२ हजार रुपये किमतीची दारू आणि टेम्पो, मोबाईल असा १७ लाख ८३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एक्साईज अधीक्षक डॉ. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली निरीक्षक गणेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही धडक कारवाई आज करण्यात आली. संशयास्पद  आयशर टेम्पो क्र. MH -04 -EY- 8964 हा हॉटेल अनंत समोर थांबवून टेम्पोच्या हौद्यात तपासणी केली असता एका चोरकप्प्यात गोवा बनावटीची दारू सापडली.या प्रकरणी सौरभ सतीश ढोकळे (  रा.झरेगाव, चिलवाडी , ता.जि.उस्मानाबाद ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत सहाय्यक दुय्यम निरीक्षक गोपाळ लक्ष्मण राणे, जवान एस एस चौधरी, वाहनचालक मुपडे, वाहनचालक चव्हाण, महिला जवान स्नेहल कुवेसकर हे सहभागी होते.साजिद शहा, खान यांनी याकामी मदतनीस म्हणून काम केले. अधिक तपास निरीक्षक गणेश जाधव करत आहेत.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

११ लाखांच्या दारुसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

कणकवली | उमेश परब : कणकवली शहरातील हॉटेल अनंत समोर राज्य उत्पादन शुल्क कणकवलीच्या पथकाने  केलेल्या धडक कारवाईत  आयशर टेम्पोतून होणारी गोवा बनावटीची १० लाख ८२ हजार रुपये किमतीची दारू आणि टेम्पो, मोबाईल असा १७ लाख ८३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एक्साईज अधीक्षक डॉ. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली निरीक्षक गणेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही धडक कारवाई आज करण्यात आली. संशयास्पद  आयशर टेम्पो क्र. MH -04 -EY- 8964 हा हॉटेल अनंत समोर थांबवून टेम्पोच्या हौद्यात तपासणी केली असता एका चोरकप्प्यात गोवा बनावटीची दारू सापडली.या प्रकरणी सौरभ सतीश ढोकळे (  रा.झरेगाव, चिलवाडी , ता.जि.उस्मानाबाद ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत सहाय्यक दुय्यम निरीक्षक गोपाळ लक्ष्मण राणे, जवान एस एस चौधरी, वाहनचालक मुपडे, वाहनचालक चव्हाण, महिला जवान स्नेहल कुवेसकर हे सहभागी होते.साजिद शहा, खान यांनी याकामी मदतनीस म्हणून काम केले. अधिक तपास निरीक्षक गणेश जाधव करत आहेत.

error: Content is protected !!