आम्ही प्रामाणिकपणे लोकांच्या दृष्टीकोनातून विचार करत अत्यावश्यक मुलभूत कामे करतो आणि करत राहणारच म्हणून मतदानाचा निकाल आमच्या बाजुनेच असेल असे मंगेश टेमकर यांचे प्रतिपादन.
मविआ पुरस्कृत आचरा ग्रामविकास आघाडीच्या प्रचाराला घरोघरी ज्येष्ठ व तरुण शिवसैनिक( उ.बा.ठा.), युवासैनिक तसेच महिला व युवतीसेना सदस्यांची उपस्थिती ; विधानसभा प्रमुख संग्राम प्रभूगांवकर व तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, विभाग प्रमुख समीर लब्दे यांचीही उपस्थिती व मार्गदर्शन.
मालवण | सुयोग पंडित ( आचरा | प्रसाद टोपले ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आचरा ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२३ साठी प्रचाराच्या अंतिम चरणामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तसेच मविआ पुरस्कृत आचरा ग्रामविकासआघाडीच्या प्रचारात प्रत्यक्ष उमेदवार घरोघरी जाऊन व्यक्तिशः प्रचार व गाठीभेटी यांना प्राधान्य देत आहेत. आचरा तिठ्याजवळील देवगड कडे जायच्या रस्त्यावर असणार्या आचरा ग्रामविकास आघाडीच्या प्रचार कार्यालयात देखील मतदारांना विविध विषयांवर मार्गदर्शन तसेच ज्येष्ठ शिवसैनिक, मविआ पुरस्कृत ग्रामविकास पॅनेलचे कार्यकर्ते यांची वर्दळ सुरु आहे. गावातील सर्व प्रभागांमध्ये आचरा ग्रामविकास आघाडीचे कार्यकर्ते, शिवसैनिक( उ.बा.ठा ), युवासैनिक दारोदारच्या प्रचारात व्यस्त असल्याने अनेक उमेदवारांना व आचरा विभाग शिवसेना पदाधिकार्यांना माध्यमांशी असा विशेष संवाद नियमीत साधता येत नसल्याचेही काही आचरा ग्रामविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.
आचरा ग्रामविकास आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार मंगेश टेमकर हे स्वतः विविध प्रभागांमध्ये जाऊन प्रचार करत आहेत त्या दरम्यान त्यांच्याशी थोडक्यात संवाद साधला असताना त्यांनी सांगितले की आम्ही प्रामाणिकपणे लोकांच्या दृष्टीकोनातून विचार करत अत्यावश्यक अशी वीज, पाणी, आरोग्य, रोजगार निर्मिती, शैक्षणिक अशी मूलभूत कामे करतो आणि करत राहणारच म्हणून मतदानाचा निकाल आमच्या बाजुनेच असेल हे विनम्रपणे सांगावेसे वाटते. आपल्या सोबतचे सर्व उमेदवार हे जनतेच्या मनातील ग्रामपंचायत सदस्य असल्याचेही त्यांनी सांगितले. पर्यटन विषयक रोजगार निर्मिती तसेच पर्यटन प्रगतीसाठी आपण व आपले आचरा ग्रामविकास आघाडी पॅनेलचे निवडून आल्यानंतर ग्रामपंचायत मार्फत अधिक सक्षम प्रयत्न असतील असेही त्यांनी सांगितले. खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांनी गेले दिड वर्ष सत्ता नसताना देखील जनतेसाठी घेतलेले कष्ट हे आचरा गांवातील सूज्ञ मतदार निश्चितच जाणतो त्यामुळे या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत आचरा ग्रामपंचायत ही आचरा ग्रामविकास आघाडीचीच असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या प्रचार मोहीमेला शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विधानसभाप्रमुख संग्राम प्रभूगांवकर, तालुका प्रमुख हरी खोबरेकर, विभाग प्रमुख समीर लब्दे, माजी सरपंच प्रणया टेमकर, चंदन पांगे, माणिक राणे, ज्येष्ठ शिवसैनिक श्याम घाडी, विनायक परब, अनिकेत पांगे व इतर शिवसेना पदाधिकारी, युवासैनिक, महिला आघाडीच्या सौ. शिंदे व सदस्य, माजी ग्रामपंचायत सदस्य अनुष्का गांवकर, श्री कुबल तसेच आचरा ग्रामविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते कार्यरत आहेत.