आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून भाजपा ओबीसी सेलचा पुढाकार
कणकवली | उमेश परब : आमदार नितेश राणे यांच्या पाठपुराव्यातून कणकवली नगरपंचायतला भाजपा ओबीसी सेलचे नरेंद्र गांवकर व विजय घरत यांच्या माध्यमातून वातानुकूलित शवपेटी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. कणकवली नगरपंचायतला ही सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी श्री गावकर व श्री घरत यांचे आभार व्यक्त केले. येत्या काळात कणकवली शहरातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यास उशीर होणार असेल तर त्या मृताच्या नातेवाईकांना ही वातानुकूलित शवपेटी घरी नेण्यास देण्यात येणार आहे. अंत्यसंस्कार झाल्यानंतर ही शवपेटी पुन्हा नगरपंचायतकडेच उपलब्ध राहणार असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी शवपेटी ची मागणी आमदार नितेश राणे यांच्याकडे केली होती. त्यानंतर आमदार नितेश राणे यांनी या संदर्भात नगराध्यक्ष समीर नलावडे यांना शब्द दिला होता. शहरातील मृत झालेल्या नागरिकांचे मृतदेह ठेवण्याकरिता कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दोनच शवपेटी असल्याने अनेकदा ताटकळत राहावे लागते. यामुळे नातेवाईकांनाही त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे कणकवली शहराचे वाढते विस्तारीकरण व शहराची असलेली गरज या दृष्टीने नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी ही मागणी केली होती. या वेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक मेघा गांगण, अभिजित मुसळे, रवींद्र गायकवाड,कविता राणे, प्रतीक्षा सावंत, मेघा सावंत, शिशिर परुळेकर, शहराध्यक्ष आण्णा कोदे, बंडू गांगण, राजू गवाणकर, उत्तम वाळके, संदीप राणे आदी उपस्थित होते.