28.7 C
Mālvan
Tuesday, April 29, 2025
IMG-20240531-WA0007

ज्येष्ठ लेदरबाॅल क्रिकेटपटू बबन रेडकर यांच्या जीवन गौरवार्थ मालवण तालुका मर्यादित लेदर बॉल २०२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहराचे माजी नगराध्यक्ष तसेच अजातशत्रू व्यक्तीमत्व अंतोन रुजाय फर्नांडिस उर्फ बबन रेडकर यांनी सिंधुदुर्ग क्रिकेटसाठी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल ‘बबन रेडकर जीवन गौरव २०-२०’ (निमंत्रितांची ) लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा दिनांक ८, ९, १० आणि ११ नोव्हेंबरला आयोजीत करण्यात आली आहे. मालवण तालुका क्रिकेट असोसिएशन आणि बबन रेडकर मित्रमंडळा तर्फे हे आयोजन होत असून मालवण शहरांमधील निमंत्रित ४ संघ आणि मालवण ग्रामीण भागातील निमंत्रित ४ संघ यात सहभागी होणार आहेत. स्पर्धेतील सर्व सामने मालवण एज्युकेशन सोसायटीच्या बोर्डिंग ग्राउंड येथे खेळविण्यात येणार आहेत.

या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक – रू.११,१११/- आणि आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक – रू.५,५५५/- आणि आकर्षक चषक तसेच उत्कृष्ठ फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक,यष्टिरक्षक, सामनावीर, मालिकावीर, शिस्तबद्ध संघ यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. या दरम्यान मालवण क्रिकेसाठी योगदान दिलेल्या माजी क्रिकेटपटूंचा, मान्यवरांचा सत्कार सोहळा देखील होणार आहे.

या स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क रू.३,०००/- असून
अधिक माहितीसाठी सुशील शेडगे : ७४९९९५५१४७, जयंत गवंडे : ९००४५७०४५५, विलास परुळेकर : ८०८७२५१९३६ आणि संदीप पेडणेकर : ९४२३३०४३७२ यांच्याशी संपर्क साधायचे आवाहन करण्यात आले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहराचे माजी नगराध्यक्ष तसेच अजातशत्रू व्यक्तीमत्व अंतोन रुजाय फर्नांडिस उर्फ बबन रेडकर यांनी सिंधुदुर्ग क्रिकेटसाठी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल 'बबन रेडकर जीवन गौरव २०-२०' (निमंत्रितांची ) लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा दिनांक ८, ९, १० आणि ११ नोव्हेंबरला आयोजीत करण्यात आली आहे. मालवण तालुका क्रिकेट असोसिएशन आणि बबन रेडकर मित्रमंडळा तर्फे हे आयोजन होत असून मालवण शहरांमधील निमंत्रित ४ संघ आणि मालवण ग्रामीण भागातील निमंत्रित ४ संघ यात सहभागी होणार आहेत. स्पर्धेतील सर्व सामने मालवण एज्युकेशन सोसायटीच्या बोर्डिंग ग्राउंड येथे खेळविण्यात येणार आहेत.

या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक - रू.११,१११/- आणि आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक - रू.५,५५५/- आणि आकर्षक चषक तसेच उत्कृष्ठ फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक,यष्टिरक्षक, सामनावीर, मालिकावीर, शिस्तबद्ध संघ यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. या दरम्यान मालवण क्रिकेसाठी योगदान दिलेल्या माजी क्रिकेटपटूंचा, मान्यवरांचा सत्कार सोहळा देखील होणार आहे.

या स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क रू.३,०००/- असून
अधिक माहितीसाठी सुशील शेडगे : ७४९९९५५१४७, जयंत गवंडे : ९००४५७०४५५, विलास परुळेकर : ८०८७२५१९३६ आणि संदीप पेडणेकर : ९४२३३०४३७२ यांच्याशी संपर्क साधायचे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!