माजी नगराध्यक्ष आचरेकर यांच्या लक्षवेधी सूचनांचीही घेतली दखल मालवण | वैभव माणगांवकर : मालवण नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या बाबतीत जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. जि.प.मुख्याधिकारी प्रजित नायर आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.खलिफे यांच्याकडे एक निवेदन देऊन नगराध्यक्षांनी लसीकरणाविषयी येणार्या अडचणी आणि लसींच्या तुटवड्याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.
ऑफलाईन लसिकरणादरम्यान उडणारे गोंधळ, शहराची लोकसंख्या आणि येणारे डोस यांचा मेळ बसत नसल्याने त्यावर योग्य उपाययोजना केली जावी असेही निवेदनात म्हटले आहे.
यावेळी नगराध्यक्षांसोबत बांधकाम सभापती मंदार केणी, नगरसेवक यतिन खोत आणि उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर होते.
खा.विनायक राऊत आणि आ.वैभव नाईक यांच्याकडेही या विषयासंबंधी माहिती देण्यात आली आहे.
मालवणचे नगरसेवक सुदेश आचरेकर यांनी कालच लसीकरणादरम्यान नागरिकांना सोसाव्या लागणाऱ्या समस्यांकडे नगराध्यक्षांचे लक्ष वेधले होते त्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी उचललेले हे एक उच्चस्तरीय पाऊल नागरीकांचे लसिकरण सुलभ करणारे ठरेल अशी मालवण शहरांत चर्चा आहे.