26.8 C
Mālvan
Thursday, September 19, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

आचरा गांवात आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत माजी सरपंच मंगेश उर्फ जिजा टेमकर, माजी सरपंच प्रणया टेमकर व अनेक जणांचा शिवसेनेत प्रवेश ; तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी बांधले शिवबंधन.

- Advertisement -
- Advertisement -

आचरा विभाग शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) , युवासेना, युवती सेना व महिला आघाडी सदस्यांची मोठी उपस्थिती.

जिल्हा प्रमुख संदेश पारकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, आचरा विभाग प्रमुख समीर लब्दे व अनेक ज्येष्ठ शिवसैनिक उपस्थित.

आचरा | ( प्रसाद टोपले / सुयोग पंडित) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा विभागात शिवसेना पक्षात (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी सरपंच मंगेश टेमकर व माजी सरपंच प्रणया टेमकर यांच्या सह अनेकांनी प्रवेश केला. आमदार वैभव नाईक व जिल्हा प्रमुख संदेश पारकर तसेच तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला आहे.

आचरा येथील हाॅटेल सी राॅक सभागृह येथे संपन्न झालेल्या भव्य कार्यक्रमामध्ये शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) मालवण तालुक्यातील अनेक पदाधिकारी, शिवसैनिक, युवती सेना सदस्य, युवासैनिक व आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी पुष्पहार अर्पण केला व सर्वांनी अभिवादन केले. यावेळी शिवसैनिक विनायक परब यांनी प्रास्ताविक तर उदय दुखंडे यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी बोलताना विनायक परब यांनी आता आचरा गांवात शिवसेनेने अनेकांच्या मनसुब्यांना भगदाड पाडले असे सांगितले. उदय दुखंडे म्हणाले की आचरा ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १३ ही सदस्य व सरपंच शिवसेनेचाच असणार व त्यासाठी सर्व शिवसेनैनिकांनी प्रयत्न करावे असे आवाहन केले. मालवणचे माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांनी सांगितले की शिवसेनेने आचरा विभागातील ग्रामपंचायतच्या प्रतिष्ठेच्या निवडणुका भाजपच्या नाकावर टिच्चून जिंकल्या. मालवणचे माजी नगरसेवक नितीन वाळके म्हणाले की भाजपा वाल्यांची सध्या निवडणुका घेण्याची हिंमत होत नाही हेच शिवसेनेचे व पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे यश आहे.

कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाच्या युवती सेना प्रमुख अधिकारी सौ शिल्पा खोत म्हणाल्या की माजी सरपंच मंगेश टेमकर व माजी सरपंच प्रणया टेमकर यांच्या पक्षातील आगमनाने खूप आनंद झाला. सामाजिक क्षेत्रातील अनेक जणांची मंगेश टेमकर व माजी सरपंच प्रणया टेमकर यांच्याबद्दल बद्दल चांगले मत आहे. आता आचरा विभागात एकत्र काम करताना आमदार वैभव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आणखीन प्रयत्न करत राहू.

यावेळी संबोधीत करताना तालुका प्रमुख हरी खोबरेकर म्हणाले की अनेक अमिषे व त्रास देण्याचा प्रयत्न करुनही जे ‘निष्ठेचे पाईक आमदार वैभव नाईक व जिल्हाप्रमुख युवानेते संदेश पारकर’ यांचे नेतृत्व मिळणे हे आमचे भाग्य आहे. तुम्ही छोटे मोठे फटाके फोडा आम्ही मोठा बाॅम्ब घेऊनच तयार असणार. जि.प. सदस्य असताना आपण आणलेला निधी जर इतर कोणी आणला असेल असे सिद्ध झाले तर आपण राजकारणाचा त्याग करु असेही तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी आवाहन दिले आहे. सध्याच्या सत्ताधारी नेतृत्वांमुळे जनतेची परिस्थिती हालाखीची आहे हे सत्य आता सर्वजण जाणतायत. तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी मंगेश टेमकर, प्रणया टेमकर व सर्वांनी एकत्रीत राहून काम करुया असे आवाहन केले.

आमदार वैभव नाईक यांनी संबोधीत करताना आचरा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व आचरा वासीयांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आणि माजी सरपंच प्रणया टेमकर व मंगेश उर्फ जिजा टेमकर यांचे स्वागत केले. शिवसेनेचे अनेक सरपंचपदासाठी इच्छुक उमेदवार असून सार्वमताने शिवसेनेचा भगवा आचरा ग्रामपंचायतवर फडकवण्यासाठी आग्रही राहीले ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. यादरम्यान आमदार वैभव नाईक यांनी आचरा विभागातील विविध विकासकामे, आमदार फंडातून दिलेली रुग्णवाहिका, तौक्ते वादळातील मदत , कोरोना काळात जनतेची केलेली योग्य सोय ही कामे जनतेला ठाऊक आहे. निवडणुकांमध्ये जातीपाती व धर्माची राजकारणे न करता विकासाचे मुद्दे व जनतेचा विश्वास सार्थ ठरवणे हेच उद्दिष्ट आहे असेही ते म्हणाले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रत्येक ग्रामपंचायतला गेल्या वर्षभरात ५० लाखांचा निधी आपण मिळवून दिलेला आहे. सातत्याने सर्वांशी संपर्क ठेवून रहात आचरा विभागातील शिवसेनाउद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने टीमवर्क दाखवले तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अपेक्षीत काम निश्चित होईलच. आम्ही दिलेली आश्वासने आम्ही प्रामाणिकपणे पूर्ण केलीत व करुच असेही आमदार वैभव नाईक यांनी सांगितले. नुकतेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट सोडून गेलेले उपसरपंच विकासासाठी नाही तर नेमके कशासाठी पक्ष सोडून गेले ते सगळे जण जाणतात असाही टोला आमदार वैभव नाईक यांनी मारला. भाजप सर्व स्तरांवर आता ‘कंत्राटीकरण’ करत असून जनतेला, कार्यकर्त्यांना वापरा व फेकून द्या ही भाजपची हुकुमशाही असून आता बहुतांश भाजपवाले जॅकेट घालून मोदी बनतायत हे हास्यास्पद चित्र पहायला मिळतंय असेही आमदार वैभव नाईक यांनी सांगितले. विकासाच्या राजकारणासाठी जिल्हा प्रमुख संदेश पारकर व आपण नेहमी आचरा वासियांसोबत असू असे आमदार वैभव नाईक यांनी आश्वासन दिले.

माजी सरपंच मंगेश उर्फ जिजा टेमकर यांनी पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर उपस्थित सर्वांचे आभार मानले. भाजपचे दत्ता सामंत व माजी खासदार डाॅ निलेश राणे यांनी आचर्यासाठी काही दिले नाही परंतु आमदार वैभव नाईक यांनी नेहमी सहकार्य केले हेच आपल्या पक्षप्रवेशाचे प्रमुख कारण असून आता शिवसेनेच्या माध्यमातून आचरा गांवात आपण सदैव एकत्रीत विकासकामे मंजूर करून पूर्ण करत राहू असे सांगितले.

जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी संबोधीत करताना सांगितले की आचरा हे ऐतिहासिक परंपरेचे गांव असून त्यातील सुसंस्कृतपणा अबाधीत राखणे ही गरज आहे. या आचरा ग्रामपंचायत निवडणूकीत जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली भगवा झेंडा फडकवणे हेच शिवसेनेचे काम असेल. आता मंगेश टेमकर व माजी सरपंच प्रणया टेमकर यांच्या मागिल दोन टर्मनंतर आता हॅटट्रीक साधण्याची संधी आहे. आचर्यातील सर्व शिवसैनिकांनी एकत्रीत पणे मंगेश टेमकर व माजी सरपंच प्रणया टेमकर यांच्या पक्षप्रवेशाचे स्वागत केले ही प्रशंसेची गोष्ट आहे. आता लवकरच आमदार वैभव नाईक हे कॅबिनेट मंत्री असतील असाही विश्वास संदेश पारकर यांनी व्यक्त केला व सांगितले की राज्यातील सर्व धर्मीयांचा शिवसेनेला व पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनाच पाठिंबा आहे. भाजप, मोदी व शहा यांना लोक कंटाळले असून संविधान वाचवण्यासाठी शिवसेनेला जनता नक्कीच कौल देणार हे स्पष्ट आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील तीनही आमदार शिवसेनेचेच असतील व ५ नोव्हेंबरच्या आचरा ग्रामपंचायत निवडणूकी नंतर १३ ग्रामपंचायत सदस्य व सरपंच शिवसेना व मविआ चाच असेल. आमदार वैभव नाईक यांच्या लोकांच्या प्रती असलेल्या संवेदना हीच तर शिवसेनेची संवेदना. शिवसेनेचे नेतृत्व हे एकात्मतेसाठी, न्यायासाठी असणारे हिंदुत्व आहे असे संदेश पारकर यांनी स्पष्ट केले.

यावेळी आमदार वैभव नाईक यांच्या सह माजी सरपंच मंगेश टेमकर, जिल्हा प्रमुख संदेश पारकर , तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी नगरसेवक नितीन वाळके, विभाग प्रमुख समीर लब्दे, उदय दुखंडे, नारायण कुबल, गणेश तोंडवळकर, दिलीप कावले, समीर हडकर, युवती सेना प्रमुख अधिकारी सौ शिल्पा खोत, ज्येष्ठ शिवसैनिक श्याम घाडी , पप्पू परुळेकर, युवा सेना विभाग प्रमुख नितीन घाडी , संकेत पाटील युवासेना विभाग प्रमुख, बाबू मिराशी, विनायक परब,राजू नार्वेकर, आबा सावंत, प्रसाद टोपले , चंदन पांगे, भाई कासवकर, श्रीकांत बागवे, महिला आघाडी प्रमुख, अनुष्का गांवकर, मालवण महिला आघाडीच्या शिंदे, मालवण शहरप्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी, युवा सेना प्रमुख समन्वयक मंदार ओरसकर, माजी पं. स. सदस्य निधी मुणगेकर, तळाशीलचे संजय केळुसकर, अरूण लाड, समीर हडकर, सचिन परब, त्रिंबक ग्रामपंचायत सदस्य सागर चव्हाण , सन्मेष उर्फ राजू परब, मालवण शहर युवा सेना प्रमुख उमेश चव्हाण, दीपक देसाई, मनोज मोंडकर व अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

आचरा विभाग शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) , युवासेना, युवती सेना व महिला आघाडी सदस्यांची मोठी उपस्थिती.

जिल्हा प्रमुख संदेश पारकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, आचरा विभाग प्रमुख समीर लब्दे व अनेक ज्येष्ठ शिवसैनिक उपस्थित.

आचरा | ( प्रसाद टोपले / सुयोग पंडित) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा विभागात शिवसेना पक्षात (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी सरपंच मंगेश टेमकर व माजी सरपंच प्रणया टेमकर यांच्या सह अनेकांनी प्रवेश केला. आमदार वैभव नाईक व जिल्हा प्रमुख संदेश पारकर तसेच तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला आहे.

आचरा येथील हाॅटेल सी राॅक सभागृह येथे संपन्न झालेल्या भव्य कार्यक्रमामध्ये शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) मालवण तालुक्यातील अनेक पदाधिकारी, शिवसैनिक, युवती सेना सदस्य, युवासैनिक व आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी पुष्पहार अर्पण केला व सर्वांनी अभिवादन केले. यावेळी शिवसैनिक विनायक परब यांनी प्रास्ताविक तर उदय दुखंडे यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी बोलताना विनायक परब यांनी आता आचरा गांवात शिवसेनेने अनेकांच्या मनसुब्यांना भगदाड पाडले असे सांगितले. उदय दुखंडे म्हणाले की आचरा ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १३ ही सदस्य व सरपंच शिवसेनेचाच असणार व त्यासाठी सर्व शिवसेनैनिकांनी प्रयत्न करावे असे आवाहन केले. मालवणचे माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांनी सांगितले की शिवसेनेने आचरा विभागातील ग्रामपंचायतच्या प्रतिष्ठेच्या निवडणुका भाजपच्या नाकावर टिच्चून जिंकल्या. मालवणचे माजी नगरसेवक नितीन वाळके म्हणाले की भाजपा वाल्यांची सध्या निवडणुका घेण्याची हिंमत होत नाही हेच शिवसेनेचे व पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे यश आहे.

कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाच्या युवती सेना प्रमुख अधिकारी सौ शिल्पा खोत म्हणाल्या की माजी सरपंच मंगेश टेमकर व माजी सरपंच प्रणया टेमकर यांच्या पक्षातील आगमनाने खूप आनंद झाला. सामाजिक क्षेत्रातील अनेक जणांची मंगेश टेमकर व माजी सरपंच प्रणया टेमकर यांच्याबद्दल बद्दल चांगले मत आहे. आता आचरा विभागात एकत्र काम करताना आमदार वैभव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आणखीन प्रयत्न करत राहू.

यावेळी संबोधीत करताना तालुका प्रमुख हरी खोबरेकर म्हणाले की अनेक अमिषे व त्रास देण्याचा प्रयत्न करुनही जे 'निष्ठेचे पाईक आमदार वैभव नाईक व जिल्हाप्रमुख युवानेते संदेश पारकर' यांचे नेतृत्व मिळणे हे आमचे भाग्य आहे. तुम्ही छोटे मोठे फटाके फोडा आम्ही मोठा बाॅम्ब घेऊनच तयार असणार. जि.प. सदस्य असताना आपण आणलेला निधी जर इतर कोणी आणला असेल असे सिद्ध झाले तर आपण राजकारणाचा त्याग करु असेही तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी आवाहन दिले आहे. सध्याच्या सत्ताधारी नेतृत्वांमुळे जनतेची परिस्थिती हालाखीची आहे हे सत्य आता सर्वजण जाणतायत. तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी मंगेश टेमकर, प्रणया टेमकर व सर्वांनी एकत्रीत राहून काम करुया असे आवाहन केले.

आमदार वैभव नाईक यांनी संबोधीत करताना आचरा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व आचरा वासीयांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आणि माजी सरपंच प्रणया टेमकर व मंगेश उर्फ जिजा टेमकर यांचे स्वागत केले. शिवसेनेचे अनेक सरपंचपदासाठी इच्छुक उमेदवार असून सार्वमताने शिवसेनेचा भगवा आचरा ग्रामपंचायतवर फडकवण्यासाठी आग्रही राहीले ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. यादरम्यान आमदार वैभव नाईक यांनी आचरा विभागातील विविध विकासकामे, आमदार फंडातून दिलेली रुग्णवाहिका, तौक्ते वादळातील मदत , कोरोना काळात जनतेची केलेली योग्य सोय ही कामे जनतेला ठाऊक आहे. निवडणुकांमध्ये जातीपाती व धर्माची राजकारणे न करता विकासाचे मुद्दे व जनतेचा विश्वास सार्थ ठरवणे हेच उद्दिष्ट आहे असेही ते म्हणाले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रत्येक ग्रामपंचायतला गेल्या वर्षभरात ५० लाखांचा निधी आपण मिळवून दिलेला आहे. सातत्याने सर्वांशी संपर्क ठेवून रहात आचरा विभागातील शिवसेनाउद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने टीमवर्क दाखवले तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अपेक्षीत काम निश्चित होईलच. आम्ही दिलेली आश्वासने आम्ही प्रामाणिकपणे पूर्ण केलीत व करुच असेही आमदार वैभव नाईक यांनी सांगितले. नुकतेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट सोडून गेलेले उपसरपंच विकासासाठी नाही तर नेमके कशासाठी पक्ष सोडून गेले ते सगळे जण जाणतात असाही टोला आमदार वैभव नाईक यांनी मारला. भाजप सर्व स्तरांवर आता 'कंत्राटीकरण' करत असून जनतेला, कार्यकर्त्यांना वापरा व फेकून द्या ही भाजपची हुकुमशाही असून आता बहुतांश भाजपवाले जॅकेट घालून मोदी बनतायत हे हास्यास्पद चित्र पहायला मिळतंय असेही आमदार वैभव नाईक यांनी सांगितले. विकासाच्या राजकारणासाठी जिल्हा प्रमुख संदेश पारकर व आपण नेहमी आचरा वासियांसोबत असू असे आमदार वैभव नाईक यांनी आश्वासन दिले.

माजी सरपंच मंगेश उर्फ जिजा टेमकर यांनी पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर उपस्थित सर्वांचे आभार मानले. भाजपचे दत्ता सामंत व माजी खासदार डाॅ निलेश राणे यांनी आचर्यासाठी काही दिले नाही परंतु आमदार वैभव नाईक यांनी नेहमी सहकार्य केले हेच आपल्या पक्षप्रवेशाचे प्रमुख कारण असून आता शिवसेनेच्या माध्यमातून आचरा गांवात आपण सदैव एकत्रीत विकासकामे मंजूर करून पूर्ण करत राहू असे सांगितले.

जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी संबोधीत करताना सांगितले की आचरा हे ऐतिहासिक परंपरेचे गांव असून त्यातील सुसंस्कृतपणा अबाधीत राखणे ही गरज आहे. या आचरा ग्रामपंचायत निवडणूकीत जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली भगवा झेंडा फडकवणे हेच शिवसेनेचे काम असेल. आता मंगेश टेमकर व माजी सरपंच प्रणया टेमकर यांच्या मागिल दोन टर्मनंतर आता हॅटट्रीक साधण्याची संधी आहे. आचर्यातील सर्व शिवसैनिकांनी एकत्रीत पणे मंगेश टेमकर व माजी सरपंच प्रणया टेमकर यांच्या पक्षप्रवेशाचे स्वागत केले ही प्रशंसेची गोष्ट आहे. आता लवकरच आमदार वैभव नाईक हे कॅबिनेट मंत्री असतील असाही विश्वास संदेश पारकर यांनी व्यक्त केला व सांगितले की राज्यातील सर्व धर्मीयांचा शिवसेनेला व पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनाच पाठिंबा आहे. भाजप, मोदी व शहा यांना लोक कंटाळले असून संविधान वाचवण्यासाठी शिवसेनेला जनता नक्कीच कौल देणार हे स्पष्ट आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील तीनही आमदार शिवसेनेचेच असतील व ५ नोव्हेंबरच्या आचरा ग्रामपंचायत निवडणूकी नंतर १३ ग्रामपंचायत सदस्य व सरपंच शिवसेना व मविआ चाच असेल. आमदार वैभव नाईक यांच्या लोकांच्या प्रती असलेल्या संवेदना हीच तर शिवसेनेची संवेदना. शिवसेनेचे नेतृत्व हे एकात्मतेसाठी, न्यायासाठी असणारे हिंदुत्व आहे असे संदेश पारकर यांनी स्पष्ट केले.

यावेळी आमदार वैभव नाईक यांच्या सह माजी सरपंच मंगेश टेमकर, जिल्हा प्रमुख संदेश पारकर , तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी नगरसेवक नितीन वाळके, विभाग प्रमुख समीर लब्दे, उदय दुखंडे, नारायण कुबल, गणेश तोंडवळकर, दिलीप कावले, समीर हडकर, युवती सेना प्रमुख अधिकारी सौ शिल्पा खोत, ज्येष्ठ शिवसैनिक श्याम घाडी , पप्पू परुळेकर, युवा सेना विभाग प्रमुख नितीन घाडी , संकेत पाटील युवासेना विभाग प्रमुख, बाबू मिराशी, विनायक परब,राजू नार्वेकर, आबा सावंत, प्रसाद टोपले , चंदन पांगे, भाई कासवकर, श्रीकांत बागवे, महिला आघाडी प्रमुख, अनुष्का गांवकर, मालवण महिला आघाडीच्या शिंदे, मालवण शहरप्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी, युवा सेना प्रमुख समन्वयक मंदार ओरसकर, माजी पं. स. सदस्य निधी मुणगेकर, तळाशीलचे संजय केळुसकर, अरूण लाड, समीर हडकर, सचिन परब, त्रिंबक ग्रामपंचायत सदस्य सागर चव्हाण , सन्मेष उर्फ राजू परब, मालवण शहर युवा सेना प्रमुख उमेश चव्हाण, दीपक देसाई, मनोज मोंडकर व अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

error: Content is protected !!