29.5 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

रोणापाल माऊली मंदिरात नवरात्रोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन.

- Advertisement -
- Advertisement -

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या रोणापाल येथील श्री देवी माऊली मंदिरात नवरात्रोत्सवा निमित्त १५ ते २३ ऑक्टोबर दरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवारी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी घटस्थापना होईल. सायंकाळी ७ वाजता सत्संगाचा कार्यक्रम होईल. सोमवार १६ रोजी सायंकाळी ७ वा. स्थानिकांची भजने तर मंगळवार १७ रोजी निमंत्रितांची भजने होतील. बुधवार १८ रोजी रात्री ८ वा. विघ्नहर्ता दशावतार नाट्यमंडळ निगुडे यांचा नाट्यप्रयोग होईल. गुरुवारी १९ रोजी रात्री ८ वा. जादुगार केतन कुमार यांचे जादूचे प्रयोग होतील. शुक्रवार २० रोजी रात्री ८ वा. ‘जुगलबंदी हरिनामाची’ कार्यक्रम अंतर्गत बुवा रुपेंद्र परब व अमित तांबुळकर यांच्यात जुगलबंदी होईल. शनिवार २१ रोजी रात्री ८ वा. श्री देवी भूमिका दशावतार लोककला नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होईल. रविवार २२ रोजी रात्री ८ वा. स्वामी दयासागर छात्रालयातील विद्यार्थी व स्थानिक कलाकारांचे मनोरंजनात्मक कार्यक्रम होतील. सोमवार २३ रोजी रात्री ८ वा. महिलांसाठी खेळ पैठणीचा अर्थात होम मिनीस्टर कार्यक्रम होईल. तीन विजेत्या स्पर्धकांना प्रशांत गावडे पुरस्कृत आकर्षक पैठणी व सुदिन गावडे पुरस्कृत सन्मानचिन्ह दिले जाईल. सोमवार २४ रोजी दुपारी २ वा. पावणी, देवलग्न व दसरोत्सव साजरा होईल. दररोज दुपारी १ वाजता महाआरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद होईल. भाविकांनी सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री देवी माऊली सांस्कृतिक उत्सव मंडळातर्फे करण्यात आले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या रोणापाल येथील श्री देवी माऊली मंदिरात नवरात्रोत्सवा निमित्त १५ ते २३ ऑक्टोबर दरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवारी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी घटस्थापना होईल. सायंकाळी ७ वाजता सत्संगाचा कार्यक्रम होईल. सोमवार १६ रोजी सायंकाळी ७ वा. स्थानिकांची भजने तर मंगळवार १७ रोजी निमंत्रितांची भजने होतील. बुधवार १८ रोजी रात्री ८ वा. विघ्नहर्ता दशावतार नाट्यमंडळ निगुडे यांचा नाट्यप्रयोग होईल. गुरुवारी १९ रोजी रात्री ८ वा. जादुगार केतन कुमार यांचे जादूचे प्रयोग होतील. शुक्रवार २० रोजी रात्री ८ वा. 'जुगलबंदी हरिनामाची' कार्यक्रम अंतर्गत बुवा रुपेंद्र परब व अमित तांबुळकर यांच्यात जुगलबंदी होईल. शनिवार २१ रोजी रात्री ८ वा. श्री देवी भूमिका दशावतार लोककला नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होईल. रविवार २२ रोजी रात्री ८ वा. स्वामी दयासागर छात्रालयातील विद्यार्थी व स्थानिक कलाकारांचे मनोरंजनात्मक कार्यक्रम होतील. सोमवार २३ रोजी रात्री ८ वा. महिलांसाठी खेळ पैठणीचा अर्थात होम मिनीस्टर कार्यक्रम होईल. तीन विजेत्या स्पर्धकांना प्रशांत गावडे पुरस्कृत आकर्षक पैठणी व सुदिन गावडे पुरस्कृत सन्मानचिन्ह दिले जाईल. सोमवार २४ रोजी दुपारी २ वा. पावणी, देवलग्न व दसरोत्सव साजरा होईल. दररोज दुपारी १ वाजता महाआरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद होईल. भाविकांनी सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री देवी माऊली सांस्कृतिक उत्सव मंडळातर्फे करण्यात आले आहे.

error: Content is protected !!