आ.वैभव नाईक आणि कुडाळ व मालवण शिवसेना सरपंच संघटना व यांचे संयुक्त प्रयोजन
मालवण | प्रतिनिधी : चिपळूण शहर व परिसरांत येऊन गेलेल्या भीषण पूरानंतर नागरिकांच्या घरांमधील वीज यंत्रणा बंद पडल्या आहेत.नुकसान झालेल्या घरांमधील विजेची दुरुस्ती करून देण्यासाठी कुडाळ व मालवण तालुक्यातील शिवसेना सरपंच संघटना व आमदार वैभव नाईक यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या माध्यमातून १०० इलेक्ट्रिशियन्सची टीम चिपळूण येथे पाठविण्याचे प्रयोजन करण्यात येत आहे.
शुक्रवार ६ ऑगस्ट आणि शनिवार ७ ऑगस्ट या दिवसांमध्ये हे मदतकार्य केले जाणार आहे. यामध्ये जास्तीत जास्त लोकांच्या घरांमध्ये लाईट दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणात घरगुती वीज जोडणीसाठी आवश्यक असणारे साहित्य लागणार आहे.
तरी दानशूर व्यक्तींना पूरग्रस्तांसाठी वीज संबंधित असलेले साहित्य वायर, बल्ब, केसिंग पट्टी, होल्डर,स्विच, ट्रीपर, आदी वस्तूंची मदत करावयाची असल्यास कुडाळ व मालवण शिवसेना शाखेमध्ये मदत जमा करावी. ह्या मदतकार्यासाठी जिल्ह्यातील इलेक्ट्रिशियन चिपळूण येथे जाण्यास इच्छुक असतील तर त्यांनी देखील कुडाळ सरपंच संघटना अध्यक्ष सचिन कदम- ९४२१९९०३९९ व मालवण सरपंच संघटना अध्यक्ष नंदू गावडे ९४२०२१००१३ यांच्याशी संपर्क करून नावं नोंदणी करावी असे आवाहन कुडाळ व मालवण शिवसेना सरपंच संघटनेच्या वतीने संयुक्तरित्या करण्यात आले आहे.