26.7 C
Mālvan
Saturday, October 19, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

सहकार क्षेत्र महर्षी, कॅथलिक बॅन्क चेअरमन व माजी सैनिक कल्याणासाठी प्रयत्नशील व्यक्तीमत्व पीटर तथा पी. एफ. डांटस यांचे निधन.

- Advertisement -
- Advertisement -

सावंतवाडी | लवीना डिसोजा : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील महर्षी व माजी सैनिकांच्या कल्याणासाठी सतत प्रयत्नशील असणारे सावंतवाडी येथील सामाजिक व्यक्तीमत्व पीटर तथा पी एफ डांटस यांचे काल रात्री निधन झाले. ते कॅथाॅलिक पतसंस्था आणि सैनिक पतसंस्थेचे चेअरमन म्हणूनही कार्यरत होते. गेले काही दिवस ते आजारी होते. उद्या सकाळी साडेआठ वाजता त्यांची अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. याबाबतची माहिती सैनिक स्कूलचे अधिकारी दीपक राऊळ यांनी दिली

पी. एफ. डान्टस यांनी सहकार क्षेत्रात भरीव काम केले होते. माजी सैनिकांना एकत्र आणत त्यांनी माजी सैनिक बॅन्केची स्थापना केली होती. माजी सैनिक, सैनिक आणि त्यांच्या परिवाराचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले होते. सहकार व सैनिक क्षेत्रात त्यांचे काम मोठे होते. त्याचबरोबर सामाजिक व राजकीय क्षेत्रात सुद्धा त्यांनी आपला ठसा कायम ठेवला होता.

गेले काही दिवस ते आजारी होते. रात्री १ वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या ता. ९ ला सावंतवाडी जेल जवळील दफन भूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सकाळी ७ : ३० वाजता त्यांच्या कोलगांव येथील निवासस्थानावरून अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, पत्नी, सून, नातवंडे असा परिवार आहे. पीटर तथा पी एफ डांटस यांच्या निधनाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व स्तरांतून शोक व्यक्त होत आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

सावंतवाडी | लवीना डिसोजा : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील महर्षी व माजी सैनिकांच्या कल्याणासाठी सतत प्रयत्नशील असणारे सावंतवाडी येथील सामाजिक व्यक्तीमत्व पीटर तथा पी एफ डांटस यांचे काल रात्री निधन झाले. ते कॅथाॅलिक पतसंस्था आणि सैनिक पतसंस्थेचे चेअरमन म्हणूनही कार्यरत होते. गेले काही दिवस ते आजारी होते. उद्या सकाळी साडेआठ वाजता त्यांची अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. याबाबतची माहिती सैनिक स्कूलचे अधिकारी दीपक राऊळ यांनी दिली

पी. एफ. डान्टस यांनी सहकार क्षेत्रात भरीव काम केले होते. माजी सैनिकांना एकत्र आणत त्यांनी माजी सैनिक बॅन्केची स्थापना केली होती. माजी सैनिक, सैनिक आणि त्यांच्या परिवाराचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले होते. सहकार व सैनिक क्षेत्रात त्यांचे काम मोठे होते. त्याचबरोबर सामाजिक व राजकीय क्षेत्रात सुद्धा त्यांनी आपला ठसा कायम ठेवला होता.

गेले काही दिवस ते आजारी होते. रात्री १ वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या ता. ९ ला सावंतवाडी जेल जवळील दफन भूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सकाळी ७ : ३० वाजता त्यांच्या कोलगांव येथील निवासस्थानावरून अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, पत्नी, सून, नातवंडे असा परिवार आहे. पीटर तथा पी एफ डांटस यांच्या निधनाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व स्तरांतून शोक व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!