30.1 C
Mālvan
Thursday, April 10, 2025
IMG-20240531-WA0007

मसुरेतील कुलदेवता उत्कर्ष मंडळ विकासवाडीच्या गणेश सजावट स्पर्धेत श्री. राम बागवे प्रथम ; छत्रपतींचे गड किल्ले अशी होती संकल्पना.

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे येथील कुलदेवता उत्कर्ष मंडळ, विकास वाडी आयोजित घरगुती गणेश सजावट स्पर्धेमध्ये मसुरे येथील राम बागवे यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. द्वितीय क्रमांक आर्यन बागवे तर उत्तेजनार्थ श्री उल्हास बागवे व श्री उदय सावंत यांनी प्राप्त केला. या स्पर्धेत एकूण ३५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

नवीन पिढीला गड किल्ले याबद्दल आवड आणि मार्गदर्शन होण्यासाठी यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांच्या सजावट विषय सर्व स्पर्धकांना देण्यात आला होता. विजयी सर्व स्पर्धकांना रोख रुपये आणि सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले. या स्पर्धेसाठी परीक्षण सौ संजना बागवे, संगीता बागवे आणि कोदे मॅडम यांनी केले. बक्षिस वितरण प्रसंगी राजन बागवे, जयवंत बागवे, आप्पा बागवे, विजय राणे, श्री शेटये, सुनील बागवे, नंदेश बागवे, चेतना बागवे, सिद्ध बागवे आणि मंडळाचे कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे येथील कुलदेवता उत्कर्ष मंडळ, विकास वाडी आयोजित घरगुती गणेश सजावट स्पर्धेमध्ये मसुरे येथील राम बागवे यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. द्वितीय क्रमांक आर्यन बागवे तर उत्तेजनार्थ श्री उल्हास बागवे व श्री उदय सावंत यांनी प्राप्त केला. या स्पर्धेत एकूण ३५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

नवीन पिढीला गड किल्ले याबद्दल आवड आणि मार्गदर्शन होण्यासाठी यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांच्या सजावट विषय सर्व स्पर्धकांना देण्यात आला होता. विजयी सर्व स्पर्धकांना रोख रुपये आणि सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले. या स्पर्धेसाठी परीक्षण सौ संजना बागवे, संगीता बागवे आणि कोदे मॅडम यांनी केले. बक्षिस वितरण प्रसंगी राजन बागवे, जयवंत बागवे, आप्पा बागवे, विजय राणे, श्री शेटये, सुनील बागवे, नंदेश बागवे, चेतना बागवे, सिद्ध बागवे आणि मंडळाचे कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!