भरतगड हायस्कूलचे शाळासमिती अध्यक्ष विठ्ठल लाकम यांच्या मातोश्री…..
मसुरे | प्रतिनिधी : मसुरे, देऊळवाडा मठ येथील रहिवाशी निर्मला लक्ष्मण लाकम ( ७८ वर्षे) यांचे मालवण येथे उपचारा दरम्यान निधन झाले.त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. मसुरे देऊळवाडा येथील भरतगड हायस्कूलचे शाळा समिती अध्यक्ष आणि प्रसिद्ध निवेदक विठ्ठल लाकम यांच्या त्या आई होत. निर्मला लाकम यांच्या निधनाचे वृत्त समजताच मसुरे परिसरांतून शोक व्यक्त होत आहे.