27.1 C
Mālvan
Saturday, April 5, 2025
IMG-20240531-WA0007

आधी अपहरण आणि नंतर सामूहीक अत्याचार ; २ टोळ्या कार्यरत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी केले आरोपींना जेरबंद..!

- Advertisement -
- Advertisement -

पर्यटन स्थळांवर व्यापक सुरक्षा वाढविण्याची होतेय आता राज्यभर मागणी.

ब्युरो न्यूज | पुणे : महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणावळा येथे, ३० सप्टेंबरला दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या घटनेमुळे लोणावळा परिसर हादरला. या घटनेत दोन टोळ्या कार्यरत असल्याचे तपासात आढळले असून पोलिसांनी आरोपींना जेरबंद केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत १० गुन्हेगारांच्या टोळीचा सहभाग असल्याचे तपसात पुढे आले आहे. पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून यातील २ आरोपी अल्पवयीन आहेत. आरोपींनी लोणावण्यात पर्यटनासाठी आलेल्या दोन अल्पवयीन मुलींचे तीन दिवसांपूर्वी अपहरण केले होते. त्यांना निर्जन स्थळी नेऊन त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला होता. एका मुलीचे लोणावळा रेल्वे स्थानकावरून अपहरण करत आरोपींनी तिला डांबून ठेवत तिला मारहाण केली. यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. पोलिसांनी अपहरण केलेल्या एका मुलाचीही सुटका केली आहे. या टोळीतील १० पैकी ४ जणांना अटक करण्यात आली आहे. लोणावळा रेल्वे स्थानक परिसरात थांबलेल्या अल्पवयीन मुलीचे दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी अपहरण केले. हनुमान टेकडी परिसरातील तिला एका घरात साखळीने बांधून ठेवत तिला मारहाण करण्यात आली. आरोपींनी तिच्यावर अत्याचार केला आहोत. पीडित मुलीच्या आईने लोणावळा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर बेताब आनंद पवार, मंदा बेताब पवार, संजना बबलू पवार, बबलू पवार, अर्चना बेताब पवार, किरण बेताब पवार, मोनिका बेताब पवार, राज सिद्धेश्वर शिंदे, करीना राज शिंदे (सर्व रा. क्रांतीनगर, हनुमान टेकडी, लोणावळा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार

दुसऱ्या घटनेत आरोपींनी उत्तरप्रदेशातील अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. पीडित मुलगी लोणावळा रेल्वे स्थानक परिसरात थांबली होती. त्यावेळी तिचे अपहरण करून तिला मारहाण करुन तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार करीना राज शिंदे, मंदाकिनी बेताब पवार, संजना बबलू ठाकूर, बबलू पवार, राज सिद्धेश्वर पवार, बेताब आनंद पवार, ज्ञानेश्वर रामभाऊ लोकरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. लोणावळा उपविभागाचे विभागीय अधिकारी सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सीताराम डुबल तपास करत आहेत.

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींपैकी राज सिद्धेश्वर शिंदे आणि ज्ञानेश्वर रामभाऊ लोकरे या दोघांना स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. तसेच आरोपींपैकी दोघे अल्पवयीन आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन येरवडा येथील सुधारणा गृहात पाठवले आहे . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील काही आरोपींच्या नावे आधीही काही गुन्ह्यांची नोंद आहे.

या संतापजनक घटनांच्या पार्श्वभूमीवर पर्यटन विकास होत असताना पर्यटन स्थळांवरील अतिरिक्त सुरक्षा वाढविण्याची मागणी आता राज्यभर सुरु झाली आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!