30.1 C
Mālvan
Tuesday, April 29, 2025
IMG-20240531-WA0007

आमदार नितेश राणेंच्या माध्यमातून खोळंबलेल्या चाकरमान्यांना दिलासा ; कणकवलीत माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते बस सेवेचा शुभारंभ.

- Advertisement -
- Advertisement -

नवलराज काळे | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड- कणकवली – वैभववाडी मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांनी खोळंबलेल्या रेल्वे प्रवासी चाकरमान्यांना दिलासा दिला आहे. कोकण मार्गावरील रेल्वे रद्द करण्यात आल्याने कणकवलीत चाकरमानी अडकले होते, यामुळे प्रवाशांचे हाल झाले. या गोष्टीची दखल घेऊन आमदार नितेश राणे यांनी जिल्ह्यात १७ एसटी बसेसची व्यवस्था करून प्रवाशांना मुंबईत घरपोच सोडण्याचा निर्णय घेतला. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला. त्याप्रमाणे आज ७ बस एसटी आगारातून सोडण्यात आल्या. याचा शुभारंभ माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उद्योजक राजू गवाणकर, विभाग नियंत्रक अभिजित पाटील, उपयंत्र अभियंता सुजित डोंगरे, आगार व्यवस्थापक प्रमोद यादव, वाहतूक निरीक्षक प्रदीप परब, चालक एस.एस. राणे, व्ही.एम. फोंडके, प्रसाद भोगले व प्रवाशी उपस्थित होते.

कोकण रेल्वे मार्ग सुरळीत होईपर्यंत आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून आणखी बसची व्यवस्था करून चाकरमान्यांना घरी सुखरूप पोहचवण्यात येईल अशी ग्वाही समीर नलावडे यांनी दिली. व सुरक्षित प्रवासासाठी समीर नलावडे यांनी प्रवाशांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार नितेश राणे यांचे प्रवाशांनी आभार मानले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

नवलराज काळे | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड- कणकवली - वैभववाडी मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांनी खोळंबलेल्या रेल्वे प्रवासी चाकरमान्यांना दिलासा दिला आहे. कोकण मार्गावरील रेल्वे रद्द करण्यात आल्याने कणकवलीत चाकरमानी अडकले होते, यामुळे प्रवाशांचे हाल झाले. या गोष्टीची दखल घेऊन आमदार नितेश राणे यांनी जिल्ह्यात १७ एसटी बसेसची व्यवस्था करून प्रवाशांना मुंबईत घरपोच सोडण्याचा निर्णय घेतला. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला. त्याप्रमाणे आज ७ बस एसटी आगारातून सोडण्यात आल्या. याचा शुभारंभ माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उद्योजक राजू गवाणकर, विभाग नियंत्रक अभिजित पाटील, उपयंत्र अभियंता सुजित डोंगरे, आगार व्यवस्थापक प्रमोद यादव, वाहतूक निरीक्षक प्रदीप परब, चालक एस.एस. राणे, व्ही.एम. फोंडके, प्रसाद भोगले व प्रवाशी उपस्थित होते.

कोकण रेल्वे मार्ग सुरळीत होईपर्यंत आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून आणखी बसची व्यवस्था करून चाकरमान्यांना घरी सुखरूप पोहचवण्यात येईल अशी ग्वाही समीर नलावडे यांनी दिली. व सुरक्षित प्रवासासाठी समीर नलावडे यांनी प्रवाशांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार नितेश राणे यांचे प्रवाशांनी आभार मानले.

error: Content is protected !!