मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरात संपूर्ण श्री गणेश उत्सव शांततेत व प्रसन्नतेने संपन्न होत असताना विसर्जनावेळी कोणताही अनुचित व अघटीत प्रकार घडू नये म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख ‘हरी खोबरेकर मित्रमंडळ’ दरवर्षी त्यांची सहकारी संच मंडळी तैनात ठेवते. यंदाही वादळी वारा, रोरावणार्या लाटा अशा वातावरणामुळे समुद्रामध्ये गणपती विसर्जन करण्यासाठी जाणार्या श्री गणेश भक्तांना धोका निर्माण होवू शकतो, हे जाणून घेवून उद्धव ठाकरे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी आपल्या मित्रमंडळाच्यावतीने याहीवर्षीही गणपती विसर्जनाला प्रत्यक्ष सहकार्य करण्यासाठी एक सहकारी मित्रमंडळी तैनात ठेवला होता. दिड, पाच, सात, नऊ दहा तसेच अकरा दिवसांचे गणपती विसर्जन करण्यासाठी ही मंडळी बंदरजेटी येथे कार्यरत होती.
गणेशभक्तांनी हरी खोबरेकर मित्रमंडळाचे आभार मानले. अकराव्या दिवशी रात्री तर समुद्राचे पाणी बंदर धक्क्या पर्यंत रोरावत होते आणि तशाही परिस्थितीत गणपती विसर्जन करण्यासाठी युवकांनी धाडसी सौजन्य दाखविले होते.
हरी खोबरेकर मित्रमंडळातर्फे गणपती विसर्जनासाठी मदत करण्यासाठी सोमनाथ लांबोर, भावेश बटाव, रोशन कांबळी, निखील बटाव, प्रणव कदम, आशिष फर्नाडिस, प्रथमेश परब, रॅक्स परेरा, विल्सन परेरा, बादल फर्नाडिस, सागर झोरे, शुभम खरात हे सहकारी स्वयंसेवीपणे तैनात होते. दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी गणपती विसर्जनासाठी हरी खोबरेकर मित्रमंडळाने व्यवस्था उपलब्ध केल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले.