मसुरे गावच्या कन्येची निवड झाल्याने परिसरांत आनंद
पोईप | प्रतिनिधी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मा.अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार मालवण तालुक्यातील मसुरे कावावाडी गावची कन्या पुणे येथील कोळी समाजांच्या अनिता गणेश आचरेकर यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनसे माथाडी कामगार सेनेच्या उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.मुंबई येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद गावडे,कार्याध्यक्ष संदीप ढवळे,सरचिटणीस राजन शितोळे,सुमंत तारी,महेंद्र जाधव,तानाजी सावंत,कोषाध्यक्ष चंद्रकांत वंदे,सचिव विलास घोणे,आझाद आदिवासी कोळी महादेव सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्याचे महिला अध्यक्षा आशाताई बोयणे, तसेच हडपसर येथील महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचे सरचिटणीस संग्राम नाईक, वैभव पास्ते,सरचिटणीस संग्राम नाईक,प्रसाद बिराजदार,लिकेश आचरेकर, प्रणव ताम्हाणे, अक्षय ठाकरे, विशाल साखरे,हरीश सुतार,सुहास हैरे, सागर मात्रे यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.तसेच महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी बोलताना अनिता आचरेकर म्हणाल्या की महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाच्या माध्यमातून मला मिळालेल्या पदाचा उपयोग मी पक्ष संघटना वाढविण्यासाठी करणार आहे त्याच प्रमाणे विविध माथाडी कामगारांचे प्रश्न तसेच महिला वर्गाचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार आहे. अनिता आचरेकर या मसुरे कावा वाडी येथील कृष्णा गिरकर यांच्या कन्या आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल मसुरे गावातून आनंद व अभिमान होत आहे.