आमदार वैभव नाईक यांनी केले हार्दिक अभिनंदन
मालवण | ब्युरो न्यूज : मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली खासदार विनायक राऊत यांची सुकन्या कु.रुची राऊत यांची सिंधुदुर्ग युवासेना विस्तारक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.याबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख व कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी रुची राऊत यांचे अभिनंदन केले आहे.तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. कु.रुची राऊत यांच्या या नियुक्तीच्या वार्तेने जिल्ह्यातील युवासेनेच्या युवक व युवती कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे व उत्साहाचे वातावरण आहे.