चिंदर ग्रामपंचायत येथे नागरिकांना मार्गदर्शन…
जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश उपस्थित…
चिंदर |विवेक परब : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत विधी आणि न्याय विभागामार्फत चिंदर ग्रामपंचायत येथे जिल्हा व सत्र न्यायालय मालवण यांच्यावतीने एड. सौ. शिल्पा टिळक यांनी नागरीकांना कायद्याविषयी मार्गदर्शन केले.
कायद्याची माहिती लोकांन पर्यंत पोचावी. हक्काचे संरक्षण, कायद्याचे राज्य, कर्तव्य रक्षण या प्रकारे मार्गदर्शन टिळक यांनी केले. यावेळी एड. शेख, एड. कांबळे, बेलिफ फर्नांडिस, उपसरपंच दिपक सुर्वे, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मांजरेकर, सौ.दुर्वा पडवळ, ग्रामविस्तार अधिकारी पी.जी.कदम, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष गांवकर, ग्रामपंचायत कर्मचारी रणजित दत्तदास, विश्राम माळगांवकर, आबा पवार, पोलिस पाटिल दिनेश पाताडे, श्रृतिका कातवणकर, किर्ती घाडी, सरीता भाटकर, उर्मिला नाईक, स्नेहा देवळी, अमर पळसंबकर, केदार गावकर, पल्लवी लाड, मंगेश नाटेकर, सारिका पारकर हे मान्यवर उपस्थित होते.