कुडाळ | प्रतिनिधी : आमदार वैभव नाईक सध्या कुडाळ मालवण मतदारसंघातील व्यावसायिक व सामाजिक गोष्टींचा व्यक्तिशः जाऊन आढावा घेत आहेत. त्याअंतर्गत त्यांनी काॅयर बोर्ड उपविभागीय कार्यालय ओरोस मार्फत कुडाळ तालुक्यातील हिर्लोक येथे महिलांसाठी काथ्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उपक्रमाला भेट दिली. प्रशिक्षणातील महिलांना उद्योगधंद्यात प्रोत्साहित करण्यासाठी रविवारी आमदार वैभव नाईक यांनी याठिकाणी भेट दिली. महिलांनी काथ्यापासून बनविलेल्या वस्तूंची पाहणी करत महिलांचे कौतुक केले.
जिल्ह्यातील महिला सक्षम झाल्या पाहिजेत, यासाठी सर्वोतपरी सहकार्य करण्याची ग्वाही आमदार वैभव नाईक यांनी यावेळी दिली. यावेळी जि. प. सदस्य नागेंद्र परब, हिर्लोक सरपंच कन्याश्री मेस्त्री, उपसरपंच नरेंद्र राणे, कुडाळ आत्मा कमिटी सदस्या स्नेहा दळवी आदी उपस्थित होते.