मसुरे | प्रतिनिधी : भंडारी समाज सेवा संघ मसुरे कावावाडी स्थानिक कमिटी अध्यक्षपदी युवा सामाजिक कार्यकर्ते पंढरीनाथ मसुरकर यांची निवड झाली आहे. उर्वरित कार्यकारिणी पुढील प्रमाणे आहे. उपाध्यक्ष जीवन मुणगेकर, सचिव कृष्णा पाटील ,खजिनदार
मिथुन खोत, सह खजिनदार सतिश मसुरकर, तर सदस्यपदी यशवंत हिंदळेकर,संतोष वायंगणकर, विष्णू पेडणेकर, किरण पेडणेकर , साबाजी हडकर, विनय वि. गिरकर,चंद्रसेन पाटिल,सागर पाटील यांची निवड करण्यात आली. भंडारी समाजाच्या उत्कर्षासाठी सर्वतोपरी प्रयत्न आपल्या सर्वांकडून करण्यात येतील असे यावेळी पंढरीनाथ मसुरकर म्हणाले.