कणकवली | ब्युरो न्यूज : सध्या कोकणवासीय श्री गणेशोत्सव सणाच्या निमित्ताने सर्वांची खरेदीसाठी बाजारात लगबग आहे. आमदार वैभव नाईक सुद्धा एका सर्वसामान्य गृहस्थाप्रमाणे स्वतः रविवारी कणकवली नरडवे नाका येथील भाजी विक्रेत्यांकडून गावठी चिबुड आणि काकडी खरेदी करताना माध्यमांच्या नजरेस पडले. काहींना आमदार नाईक यांच्यासह सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही.
कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक हे कोणताच बढ़ेजाव न करता व कुठलाच तामझाम लवाजमा न घेता अगदी सर्वसामान्य माणसांसारखे मिसळतात हेच मोठे आश्चर्य व आनंद असल्याचे तिथे उपस्थित लोकांची प्रतिक्रिया होती. कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव यांचा हा ‘साधे पणाचा गृहस्थ स्वॅग’ त्यांची जबाबदार कौटुंबिक बाजू दाखवून गेला म्हणून समाधान वाटल्याचेही तिथल्या बहुतेक जणांनी सांगितले.
सौजन्य | कणकवली ब्युरो