23 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

रिक्षा व्यावसायिक संजय कोळंबकर यांची आत्महत्या ; मालवण एस टी स्थानक परिसरातील अनुभवी रिक्षा व्यावसायिक.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहर एस टी स्टॅन्ड परिसरात गेली ३० वर्षे रिक्षा व्यवसायाशी निगडीत असलेले व बौद्धवाडी येथील संजय कृष्णा कोळंबकर यांनी मध्यरात्री राहत्या घराच्या खोलीत दोरीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. ते ४९ वर्षांचे होते. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. मालवण पोलीस ठाण्यात या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

संजय कोळंबकर हे बस स्थानक परिसरात रिक्षा व्यवसाय करत असत. काल गुरुवारी रात्री ते नेहमीप्रमाणे त्यांच्या खोलीत झोपण्यासाठी गेले. सकाळी घरातील सदस्यांनी त्यांचा दरवाजा ठोठावला असता कोणताही आतून उत्तर आले नाही, म्हणून त्यांचे बंधू संतोष कोळंबकर यांनी आत पाहिले असता भाऊ संजय कोळंबकर यांनी दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना देताच पोलीस उपनिरीक्षक नितीन नरळे, विलास टेंबुलकर यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. याबाबत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. पोलिस विलास टेंबुलकर अधिक तपास करत आहेत.

संजय कोळंबकर यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी, भाऊ, भावजय असा परिवार आहे. संजय कोळंबकर हे त्यांच्या युवा वयापासूनच रिक्षा चालक म्हणून सुप्रसिद्ध होते. नेहमी हसतमुख असणारे एक व्यक्तिमत्व हरपल्याने मालवण मधील रिक्षा चालक मालक बांधव व नागरीकांत शोकाचे वातावरण आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

1 Comment

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहर एस टी स्टॅन्ड परिसरात गेली ३० वर्षे रिक्षा व्यवसायाशी निगडीत असलेले व बौद्धवाडी येथील संजय कृष्णा कोळंबकर यांनी मध्यरात्री राहत्या घराच्या खोलीत दोरीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. ते ४९ वर्षांचे होते. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. मालवण पोलीस ठाण्यात या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

संजय कोळंबकर हे बस स्थानक परिसरात रिक्षा व्यवसाय करत असत. काल गुरुवारी रात्री ते नेहमीप्रमाणे त्यांच्या खोलीत झोपण्यासाठी गेले. सकाळी घरातील सदस्यांनी त्यांचा दरवाजा ठोठावला असता कोणताही आतून उत्तर आले नाही, म्हणून त्यांचे बंधू संतोष कोळंबकर यांनी आत पाहिले असता भाऊ संजय कोळंबकर यांनी दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना देताच पोलीस उपनिरीक्षक नितीन नरळे, विलास टेंबुलकर यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. याबाबत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. पोलिस विलास टेंबुलकर अधिक तपास करत आहेत.

संजय कोळंबकर यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी, भाऊ, भावजय असा परिवार आहे. संजय कोळंबकर हे त्यांच्या युवा वयापासूनच रिक्षा चालक म्हणून सुप्रसिद्ध होते. नेहमी हसतमुख असणारे एक व्यक्तिमत्व हरपल्याने मालवण मधील रिक्षा चालक मालक बांधव व नागरीकांत शोकाचे वातावरण आहे.

error: Content is protected !!