तालुका अध्यक्ष श्री .अवी सामंत यांची प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती..
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाची आता जिल्ह्यातील पर्यटन व त्यावर आधारीत व्यवससायांबद्दल ठोस अशी व्यवसायनिती आता एकजुटीने करण्यावर आता मंडळाच्या नविन व तडफदार कार्यकारणीने आरंभ केला आहे. गेल्या काही वर्षातील पर्यटनाचा विविध स्तरांवर अभ्यास करुन त्यातिल साधक बाधक व्यावसायिक घटकांवर सर्व पर्यटन व्यावसायिक एकत्र येऊन सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यवसाय मंडळाचा एकात्म व सर्वांगीण विकास घडवताना दिसत आहेत.
याअंतर्गत महासंघातर्फे हाॅटेल व रिसॉर्टला औद्योगिक दर्जा , कृषी पर्यटन, बीच सॅक धोरण व इतर धोरण या विषयावर आधारित कार्य शाळा आयोजित केली असून त्याची नोंदणी, फायदे आणि कार्यपद्धती या बाबत माहितीही देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसाईक महासंघ मालवण तालुक्याची बैठक बुधवार दिनांक 20 ऑक्टोबर 2021रोजी संध्याकाळी 4 वाजता ,हॉटेल सायबा ,कोळंब येथे संप्पन होणार आहे तरी तालुक्यातील सर्व पर्यटन व्यावसायिकांनी व महासंघाच्या सदस्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन महासंघाचे तालुका अध्यक्ष श्री.अवी सामंत यांनी केले आहे.या बैठकीत परप्रांतीय व्यावसायिकांमुळे स्थानिक व्यावसायिकांना होणारी हानी याविषयावरही चर्चा केली जाणार आहे असे श्री अवी सामंत यांनी स्पष्ट केले आहे.