मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुका व शहराचे उगवते युवा नेतृत्व म्हणून अल्पावधीत ओळखले जाणार्या सौरभ ताम्हणकर यांनी काही दिवसांपूर्वी शहरातील वाढत्या डासांच्या प्रादुर्भावा संदर्भात उपाययोजनेसाठी नगरपरिषद मुख्याधिकारी व प्रशासक श्री संतोष जिरगे यांची भेट घेत चर्चा केली होती व त्यात ‘फाॅगिंग मशीन’ उपलब्धतेसाठीही मागणी केली होती. प्रशासक श्री संतोष जिरगे यांनी त्या मशीनच्या लवकरच उपलब्धतेचे संकेत दिले होते. इतरही आजी माजी लोकप्रतिनिधींनी व स्थानिकांनी या आरोग्य विषयक समस्येकडे प्रशासनाशी चर्चा केली होती.
आज १२ सप्टेंबरला ती ‘फाॅगिंग मशीन’ नगरपरिषद प्रशासनाकडून उपलब्ध झाली. त्या मशीनच्या प्रात्यक्षिका दरम्यान सौरभ ताम्हणकर यांच्या सह मुख्याधिकारी व प्रशासक श्री संतोष जिरगे , माजी नगरसेवक व माजी बांधकाम सभापती मंदार केणी, माजी नगरसेवक दीपक पाटकर, नगरपालिका प्रशासनाचे कर्मचारी उपस्थित होते. युवा कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर यांनी नगरपरिषद प्रशासनाचे मालवण वासियांतर्फे आभार मानले आहेत व ही मशीन आता शहरभर लवकरच कार्यरत होईल व डासांची द्रव फवारणीही नियमीत सुरु राहील अशी आशा व्यक्त केली आहे.