मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा प्राथ. शिक्षक सहकारी पतपेढी, शाखा – मालवणच्या शाखाधिकारी व मसुरे देऊळवाडा गावच्या स्नुषा सौ.शुभदा सुगंध तांबे (४८ वर्षे ) यांचे दीर्घ आजाराने रविवारी दुःखद निधन झाले. शुभदा या मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या. गावात सामाजीक क्षेत्रात मोठे योगदान होते. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, दिर,जाऊ,सासू,पुतणे, पुतणी,भाऊ,बहीण असा मोठा परिवार आहे. रेंबवली जिल्हा परिषद शाळा देवगड चे आदर्श मुख्याध्यापक सुगंध तांबे यांची पत्नी, जिल्हा परिषद शाळा ओटव क्र. १ चे आदर्श शिक्षक आणि प्राथमिक शिक्षक पतपेढी शाखा कणकवली चे संचालक आनंद तांबे यांच्या त्या भावजय आणि युवा क्रिकेटपटू मिथिलेश तांबे यांच्या त्या आई, माजी शिक्षण विस्तार अधिकारी उदय सर्पे यांच्या त्या पुतणी होत.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -