सेवानिवृत्त विस्तार अधिकारी अकुंश मुणगेकर यांच्या तर्फे दिला जाणारा उपक्रमशील ग्रामविकास अधिकारी म्हणून मालवण तालुक्यात व्दितिय क्रमांक
मालवण|विवेक परब : चिंदर ग्रामविकास अधिकारी प्रकाश कदम यांचा मालवण पंचायत समितीच्यावतीने कृषिदिना निमित्त कृषी विभागाच्या विविध योजना उत्कृष्ट प्रकारे राबवील्या बद्दल माजी खासदार डाँ नीलेशजी राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. चिंदर येथे गेली पाच वर्षे ग्रामविकास अधिकारी म्हणून काम करणारे प्रकाश कदम मागील पाच वर्षांपासून चिंदर गावांमध्ये विविध उपक्रम राबवुन चांगली सेवा देत आहेत सन २०१६ यापासून बायोगॅसमध्ये उत्कृष्ट काम करून गावामध्ये पंचावन्न बायोगॅस बांधून पूर्ण केले आहेत. मागील पाच वर्षांमध्ये तालुक्यात सर्वाधिक बायोगॅस चिंदर गावामध्ये बांधण्यात आले आहेत तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून चिंदर गावामध्ये काजू लागवड, बांबू लागवड, गांडूळ युनिट, गोठा बांधणे इत्यादी कामे करून शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत.
सन २०२१-२२ मध्ये कृषी विभागाच्या विविध योजना चांगल्या प्रकारे राबविल्यामुळे यावर्षी सेवानिवृत्त विस्तार अधिकारी श्री अंकुश मुणगेकर यांच्या तर्फे दिला जाणारा उपक्रमशील ग्रामविकास अधिकारी म्हणून जाहीर केलेल्या पुरस्कारामध्ये चिंदर ग्रामविकास अधिकारी पी जी कदम यांनी दुसरा क्रमांक प्राप्त करून रक्कम रुपये तीन हजारांचे बक्षीस मिळविले आहे. या पुरस्कारासाठी गावांमध्ये राबविण्यात आलेल्या बायोगॅस, फळबाग लागवड, बांबू लागवड, गांडूळ युनिट, शेतकरी मासिक, वनराई व कच्चे बंधारे व कृषी विभागाच्या संलग्न योजनांचा विचार करण्यात आला. कार्यक्रमासाठी माननीय गटविकास अधिकारी, सभापती उपसभापती कृषी अधिकारी, पदाधिकारी हजर होते.