24.6 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007

राजकीय खेळपट्टी पाहून प्रत्येक निवडणुकीत कोणत्या संघात जायचे हे ठरवणारे आचरेकर यांना मालवणवासीय चांगलेच ओळखतात ; शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी माजी नगराध्यक्षांवर डागली तोफ.

- Advertisement -
- Advertisement -

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचे प्रखर विचार ; गेले आठवडाभर शांत असणारे तालुका प्रमुख हरी खोबरेकर सामाजिक व सांस्कृतिक जबाबदारीत होते व्यस्त.

खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण, सिंधुदुर्ग जिल्हा व मालवण योग्य मार्गाक्रमण करेल असा दिला विश्वास.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर हे गेले आठवडाभर तालुक्यातल्या विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमात व्यस्त होते. दरम्यान विरोधक भाजपा व इतरांकडून पक्षाबाबत व त्यांच्याबाबत झालेल्या टीकेवर त्यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. नंतर काल गुरुवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखा कार्यालयात त्यांनी माध्यमांशी संवाद साधून त्यांच्यावर व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर झालेल्या आरोपांचा ‘एक कलमी’ समाचार घेतला. प्रसार माध्यमांशी संवाद साधल्यानंतर आपली सिंधुनगरी चॅनेलशी संदेशात्मक बोलताना त्यांनी स्पष्ट केले की लोकांच्या कल्याणासाठी भेदाभेद किंवा वादविवाद यांत पडणे आपल्याला मान्य नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कडवा शिवसैनिक असल्याने निवडणूकीच्या आधी ‘खेळपट्टी बघून कोणत्या संघात जायचे’ असली शिकवण आपली नाही. आचरेकर यांची ती वृत्ती आता मालवण वासियांनी व्यवस्थित ओळखलेली असल्याने दत्ता सामंत यांच्या कर्तृत्वाची भीती आम्हाला घालून त्यांनी स्वतःचे कर्तृत्व किती शून्य आहे ते मस्तपैकी सिद्ध केले आहे. तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांनी यावर पुस्ती जोडत सांगितले की मी आठवडाभरापूर्वीच कुठल्याही गोष्टीला ‘एकटा पुरेसा आहे’ हे स्पष्ट केल्यानंतर विरोधकांनी संघटनात्मक दृष्ट्या सर्व स्तरांवर आपल्या विरुद्ध जेवढी वक्तव्ये केली त्यानंतर एक जबाबदार माजी जि. प .
सदस्य, तालुकाप्रमुख व शिवसैनिक म्हणून आपली प्रतिमा आणखीन उजळून निघाली. घाणेरडे राजकारण सच्च्या शिवसैनिकाला कधीच जमले नसल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले. सिंधुदुर्ग जिल्हा व कोकणात खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे ही नेतृत्व समर्थ असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सच्चा पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसैनिक यांना कधीही विरोधकांच्या वायफळ टीकेला वेळ नसतो असाही शेरा तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांनी मारला आहे. खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण, सिंधुदुर्ग जिल्हा व मालवण योग्य मार्गाक्रमण करेल असा विश्वास असल्याने विरोधकांना जास्त काळजी करायची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले.

मालवणात भाजपा विरुद्ध शिवसेना ठाकरे गट पदाधिकारी यांच्यात शाब्दिक वार पलटवार सुरूच आहेत. ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी भाजपा नेते दत्ता सामंत यांच्यावर केलेल्या टिकेला माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी टिका केल्यानंतर खोबरेकर यांनी आचरेकर यांच्यावर पलटवार केला आहे. सुदेश आचरेकर हे भाजपाच्या दत्ता सामंत योजनेतील “लाभार्थी” आहेत. निवडणूक होईपर्यंत ते भाजपा नेत्यांना “हम साथ साथ है” ची भूमिका दाखवतात. तर निवडणुका होताच ‘हम आपके है कौन ?’या भूमिकेत असतात. दत्ता सामंत यांच्या नादाला लागू नका, असा सल्ला ते आम्हाला देत आहेत. मात्र त्यांनीच आमचा नाद करू नये. अन्यथा आगामी पालिका निवडणुकीत तुमचा तंबूसह बांबू देखील उखडून टाकू, असा इशाराही तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार संवादात दिला होता.

शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी गुरुवारी शिवसेना शाखेत जेंव्हा पत्रकार परिषद घेतली . शहरप्रमुख बाबी जोगी, युवा सेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, मंदार केणी, महेश जावकर, उमेश चव्हाण, उमेश मांजरेकर, नरेश चव्हाण, सन्मेष परब, दीपा शिंदे, निनाक्षी शिंदे तेंव्हा उपस्थित होते. यावेळी हरी खोबरेकर म्हणाले, सुदेश आचरेकर यांना दत्ता सामंत यांना कोणी बोलल्यावर लगेच राग येतो, वेदना होतात. दत्ता सामंत यांचे गोडवे गाताना निलेश राणे यांची पाठीमागून निंदा नालस्ती करण्याचे काम ते करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

भाजपा महासागर आहे, हे आम्हाला पण मान्य आहे. २०१४, २०१९ मध्ये आमच्या सारख्या निष्ठावंत शिवसैनिक आणि भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांनी भाजपाला महासागर बनवण्याचे काम केले. पण नद्या नाल्यामध्ये जसा पाला पाचोळा वाहून येतो, तसे आचरेकर आणि त्यांचे नेते भाजपात आल्यामुळे हा महासागर दूषित झाला आहे, असे सांगून आचरेकर यांची संस्कृती मालवणच्या जनतेला चांगलीच माहित आहे. निवडणुकीत राजा गावकर यांना मारहाण असो अथवा पोलीस उपनिरीक्षकांना धक्काबुक्की वेळी घडलेला प्रकार सर्वांनी अनुभवला आहे. त्यामुळे सुदेश आचरेकर यांनी आपला भूतकाळ तपासावा, मागील सात आठ वर्ष नगराध्यक्ष पदापासून दूर असल्याने आलेल्या निराशेतून ते काहीही बरळत आहेत, असा उपहास हरी खोबरेकर यांनी व्यक्त केला आहे.

भाजप, आचरेकर व अन्य विरोधकांना अगदी ग्रामपंचायत स्तर व ग्रासरुटवर येऊन लोकांचे प्रश्न सोडवणे अवघड आहे परंतु ग्रासरुटवरील एखाद्या कार्यकर्त्यावर टीका करणे सहज शक्य आहे यातूनच विरोधकांची वृत्ती आता जनतेला कळली असल्याचा ‘शाब्दिक स्ट्रोक’ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी लगावला आहे. आपण लोकांसाठीच राजकीय व सामाजिक जीवनात आलो व आहोत व विनम्रपणे लोकांसाठीच कार्य करत राहू , विरोधकांच्या चांगल्या गोष्टीला नक्कीच सन्मान देऊ परंतु वायफळ टीकेला हद्दपार करु असे प्रतिपादन तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांनी केले

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचे प्रखर विचार ; गेले आठवडाभर शांत असणारे तालुका प्रमुख हरी खोबरेकर सामाजिक व सांस्कृतिक जबाबदारीत होते व्यस्त.

खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण, सिंधुदुर्ग जिल्हा व मालवण योग्य मार्गाक्रमण करेल असा दिला विश्वास.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर हे गेले आठवडाभर तालुक्यातल्या विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमात व्यस्त होते. दरम्यान विरोधक भाजपा व इतरांकडून पक्षाबाबत व त्यांच्याबाबत झालेल्या टीकेवर त्यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. नंतर काल गुरुवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखा कार्यालयात त्यांनी माध्यमांशी संवाद साधून त्यांच्यावर व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर झालेल्या आरोपांचा 'एक कलमी' समाचार घेतला. प्रसार माध्यमांशी संवाद साधल्यानंतर आपली सिंधुनगरी चॅनेलशी संदेशात्मक बोलताना त्यांनी स्पष्ट केले की लोकांच्या कल्याणासाठी भेदाभेद किंवा वादविवाद यांत पडणे आपल्याला मान्य नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कडवा शिवसैनिक असल्याने निवडणूकीच्या आधी 'खेळपट्टी बघून कोणत्या संघात जायचे' असली शिकवण आपली नाही. आचरेकर यांची ती वृत्ती आता मालवण वासियांनी व्यवस्थित ओळखलेली असल्याने दत्ता सामंत यांच्या कर्तृत्वाची भीती आम्हाला घालून त्यांनी स्वतःचे कर्तृत्व किती शून्य आहे ते मस्तपैकी सिद्ध केले आहे. तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांनी यावर पुस्ती जोडत सांगितले की मी आठवडाभरापूर्वीच कुठल्याही गोष्टीला 'एकटा पुरेसा आहे' हे स्पष्ट केल्यानंतर विरोधकांनी संघटनात्मक दृष्ट्या सर्व स्तरांवर आपल्या विरुद्ध जेवढी वक्तव्ये केली त्यानंतर एक जबाबदार माजी जि. प .
सदस्य, तालुकाप्रमुख व शिवसैनिक म्हणून आपली प्रतिमा आणखीन उजळून निघाली. घाणेरडे राजकारण सच्च्या शिवसैनिकाला कधीच जमले नसल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले. सिंधुदुर्ग जिल्हा व कोकणात खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे ही नेतृत्व समर्थ असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सच्चा पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसैनिक यांना कधीही विरोधकांच्या वायफळ टीकेला वेळ नसतो असाही शेरा तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांनी मारला आहे. खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण, सिंधुदुर्ग जिल्हा व मालवण योग्य मार्गाक्रमण करेल असा विश्वास असल्याने विरोधकांना जास्त काळजी करायची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले.

मालवणात भाजपा विरुद्ध शिवसेना ठाकरे गट पदाधिकारी यांच्यात शाब्दिक वार पलटवार सुरूच आहेत. ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी भाजपा नेते दत्ता सामंत यांच्यावर केलेल्या टिकेला माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी टिका केल्यानंतर खोबरेकर यांनी आचरेकर यांच्यावर पलटवार केला आहे. सुदेश आचरेकर हे भाजपाच्या दत्ता सामंत योजनेतील "लाभार्थी" आहेत. निवडणूक होईपर्यंत ते भाजपा नेत्यांना "हम साथ साथ है" ची भूमिका दाखवतात. तर निवडणुका होताच 'हम आपके है कौन ?'या भूमिकेत असतात. दत्ता सामंत यांच्या नादाला लागू नका, असा सल्ला ते आम्हाला देत आहेत. मात्र त्यांनीच आमचा नाद करू नये. अन्यथा आगामी पालिका निवडणुकीत तुमचा तंबूसह बांबू देखील उखडून टाकू, असा इशाराही तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार संवादात दिला होता.

शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी गुरुवारी शिवसेना शाखेत जेंव्हा पत्रकार परिषद घेतली . शहरप्रमुख बाबी जोगी, युवा सेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, मंदार केणी, महेश जावकर, उमेश चव्हाण, उमेश मांजरेकर, नरेश चव्हाण, सन्मेष परब, दीपा शिंदे, निनाक्षी शिंदे तेंव्हा उपस्थित होते. यावेळी हरी खोबरेकर म्हणाले, सुदेश आचरेकर यांना दत्ता सामंत यांना कोणी बोलल्यावर लगेच राग येतो, वेदना होतात. दत्ता सामंत यांचे गोडवे गाताना निलेश राणे यांची पाठीमागून निंदा नालस्ती करण्याचे काम ते करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

भाजपा महासागर आहे, हे आम्हाला पण मान्य आहे. २०१४, २०१९ मध्ये आमच्या सारख्या निष्ठावंत शिवसैनिक आणि भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांनी भाजपाला महासागर बनवण्याचे काम केले. पण नद्या नाल्यामध्ये जसा पाला पाचोळा वाहून येतो, तसे आचरेकर आणि त्यांचे नेते भाजपात आल्यामुळे हा महासागर दूषित झाला आहे, असे सांगून आचरेकर यांची संस्कृती मालवणच्या जनतेला चांगलीच माहित आहे. निवडणुकीत राजा गावकर यांना मारहाण असो अथवा पोलीस उपनिरीक्षकांना धक्काबुक्की वेळी घडलेला प्रकार सर्वांनी अनुभवला आहे. त्यामुळे सुदेश आचरेकर यांनी आपला भूतकाळ तपासावा, मागील सात आठ वर्ष नगराध्यक्ष पदापासून दूर असल्याने आलेल्या निराशेतून ते काहीही बरळत आहेत, असा उपहास हरी खोबरेकर यांनी व्यक्त केला आहे.

भाजप, आचरेकर व अन्य विरोधकांना अगदी ग्रामपंचायत स्तर व ग्रासरुटवर येऊन लोकांचे प्रश्न सोडवणे अवघड आहे परंतु ग्रासरुटवरील एखाद्या कार्यकर्त्यावर टीका करणे सहज शक्य आहे यातूनच विरोधकांची वृत्ती आता जनतेला कळली असल्याचा 'शाब्दिक स्ट्रोक' शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी लगावला आहे. आपण लोकांसाठीच राजकीय व सामाजिक जीवनात आलो व आहोत व विनम्रपणे लोकांसाठीच कार्य करत राहू , विरोधकांच्या चांगल्या गोष्टीला नक्कीच सन्मान देऊ परंतु वायफळ टीकेला हद्दपार करु असे प्रतिपादन तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांनी केले

error: Content is protected !!